Wednesday, April 24, 2024
Homeनगरगुंजाळे गावात महावितरण अभियंत्याला मारहाण

गुंजाळे गावात महावितरण अभियंत्याला मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

चोरून घेतलेले वीज कनेक्शन कट केले म्हणून राहुरी येथील महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता मंगेश गांगुर्डे यांना वांबोरी येथील गुंजाळे गावात मारहाण करण्यात आली.

- Advertisement -

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाबासाहेब चेडवाल याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजे दरम्यान राहुरी येथील महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता मंगेश तानाजी गांगुर्डे (वय 30 वर्षे) हे महावितरण कंपनीचे अंतर्गत एक गाव एक दिवस अभियानानुसार राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील गुंजाळे येथे जाऊन महावितरण कंपनीचे विनापरवाना बेकायदा गुंजाळे गावातील एल्टी पोलवरील अधिकृत घेतलेल्या कनेक्शच्या केबल वायरमधून आरोपी बाबासाहेब चेडवाल रा. गुंजाळे, वांबोरी ता. राहुरी याने बेकायदेशीररित्या कनेक्शन घेतलेले होते.

ते कनेक्शन यातील फिर्यादी व साक्षीदार यांनी सांगितले, तुमचे कनेक्शन आम्ही कट केले आहे. त्यावेळी आरोपी बाबासाहेब चेडवाल याने तुम्हाला काय करायचे ते करून घ्या,असे म्हणून कनिष्ठ अभियंता मंगेश गांगुर्डे यांना चापटीने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला आहे. असे गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. 2049/2020 भादंवि. कलम 353, 323, 504, 506 प्रमाणे बाबासाहेब चेडवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी चेडवाल हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या