Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकघरावर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून गावठी कट्टा व कोयता जप्त

घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून गावठी कट्टा व कोयता जप्त

नाशिक रोड | प्रतिनिधी | Nashik Road

गोरेवाडी परिसरात एका घरावर कोयता व तलवारीच्या सहाय्याने हल्ला करून नुकसान करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला (criminal) नाशिक रोड पोलिसांनी (Nashik Road Police) पाठलाग करून सिताफिने अटक केली असून

- Advertisement -

त्याच्याकडून एक गावठी कट्टा (gun) कोयता (sickle) व जिवंत काढतूस (live cartridge) जप्त केले असून नाशिक रोड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबाबतचे वृत्त असे की नाशिक रोड (nashik road) परिसरात असलेल्या गोरेवाडी भागात संदीप शंकर काकळीज यांच्या घरावर गणेश उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे याने तलवार व कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करून घराची तोडफोड केली होती त्यानंतर वाघमारे हा फरार झाला होता.

याप्रकरणी काकळीज यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तक्रार दाखल केली होती या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Senior Police Inspector Anil Shinde) यांनी दखल घेतली व संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान वाघमारे हा एकलहरे भागात असलेल्या ट्रॅक्सन परिसरात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळताच ते व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गणेश नायदे राजू पाचोरकर पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे,

विशाल सपकाळे, हवालदार अनिल शिंदे, विलास गांगुर्डे, वसंत काकड, अविनाश देवरे, विजय टेमघर, मनोहर शिंदे, महेंद्र जाधव, विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख, सोमनाथ जाधव, राकेश बोडके, केतन कोकाटे, योगेश रानडे आदींनी एकलहरे ट्रॅक्शन भागात गस्त करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान छकुल्या वाघमारे हा येत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.

परंतु तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून सीताफेने ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा (gun) एक जिवंत कडतुस व तलवार आढळून आली याप्रकरणी पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छकुल्या वाघमारे यांच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde), उपायुक्त चंद्रकांत पाडवी (Deputy Commissioner Chandrakant Padvi), सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे (Assistant Commissioner of Police Ambadas Bhusare) आदींनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या