Friday, April 26, 2024
Homeक्रीडाGT vs DC : गुजरात-दिल्ली आज आमनेसामने

GT vs DC : गुजरात-दिल्ली आज आमनेसामने

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आयपीएल १६ मध्ये आज मंगळवारी यजमान दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा सामना आयपीएल २०२२ चा चॅम्पियन गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाशी होणार आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे….

- Advertisement -

दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात आयपीएल २०२३ मध्ये निराशाजनक झाली आहे. लखनऊ येथील एकाना क्रिकेट मैदानावर झालेल्या सलामी सामन्यात दिल्ली संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर गुजरात टायटन्स संघाने अहमदाबाद येथील आयपीएल १६ च्या उदघाटनाच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पराभूत करून शानदार सुरुवात केली आहे. आता दिल्लीवर विजय संपादन करून आयपीएल १६ मधील आपला दुसरा विजय संपादन करण्यासाठी गुजरात सज्ज आहे.

मात्र दिल्लीविरुद्ध लढतीपूर्वी पाहुण्या गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मधल्या फळीतील फलंदाज केन विलियम्सन दुखापतीमुळे आयपीएल बाहेर झाला आहे. गुजरात आणि चेन्नई यांच्यातील अहमदाबाद येथील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती.

गुजरात लवकरच केन विलियम्सनचा बदली खेळाडूची घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बाब म्हणजे एन्रिक नॉरकिया आणि लुंगी इंगिडी दक्षिण आफ्रिका आणि नेदर्लंड्स यांच्यातील एकदिवसीय मालिका आटोपून भारतात आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी दखल झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद डेविड वॉर्नरकडे असणार आहे.

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

तर हार्दिक पांड्याकडे गुजरात टायटन्स संघाची कमान असणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात संघाने दिल्लीला रिषभ पंतच्या नेतृत्वात पराभवाची धूळ चारली होती. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दिल्ली मैदानात उतरणार आहे. दिल्ली संघाचा नियमित कर्णधार रिषभ पंत एक खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण, CCTV Footage आले समोर

मात्र तो सामन्यात प्रेक्षक म्हणून सामील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र आयपीएल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. आज सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या