Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरातमध्ये राजकीय भूकंप; विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

गुजरातमध्ये राजकीय भूकंप; विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

दिल्ली | Delhi

गुजरातच्या राजकारण (Gujrat Politics) मोठा राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री विजय रुपाणी (CM Rupani Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Gujarat Chief Minister Vijay Rupani Resigns)

- Advertisement -

त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत (Governor Acharya Devvrat) यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

राजीनामा दिल्यानंतर रूपाणी (cm rupani) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे, कुणाचाही माझ्या दबाव नाही. मला संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे आभार मानतो. तसेच माझ्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडणार असल्याचे रूपाणी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या