Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रगुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नाशिक, धुळे, नंदुरबार व पालघर जिल्ह्यात...

गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नाशिक, धुळे, नंदुरबार व पालघर जिल्ह्यात…

मुंबई | Mumbai

गुजरात विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections in Gujarat ) महाराष्ट्रातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांत मतदारांसाठी एक दिवसाची पगारी सुट्टी ( One day paid leave for voters in the state ) जाहीर केली आहे.

- Advertisement -

१ व ५ डिसेंबर अशा दोन दिवशी पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.

नोकरदार मंडळींना मतदान करता यावे, यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत दिली जाते. राज्यातील निवडणुकांच्यावेळी असा आदेश देण्यात येतो. मात्र, आता शेजारच्या राज्यातही मतदारांना मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्रातील सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.

गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात नोकरी, व्यवसायासाठी आलेले आहेत. त्यांची नावे गुजरातमधील मतदार यादीतच आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यासाठी तेथे सुट्टी असेलच मात्र, महाराष्ट्रात आलेल्या मतदारांनाही तेथे जाऊन मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय ज्या कंपन्या सरकारचा आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या