Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशदेशात मंकीपॉक्सचा धोका वाढला; केंद्राने घेतला 'हा' निर्णय

देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला; केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

एकीकडे जगभरात करोनाने (Corona) थैमान घातले आहे. आता मंकीपॉक्सने (Monkeypox) भारतात (India) शिरकाव केला आहे. देशात आतापर्यंत एकूण पाच जणांना मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याची माहिती मिळत आहे….

- Advertisement -

बुधवारी गाझियाबाद (Ghaziabad) आणि नोएडामधून (Noida) मंकीपॉक्सचे 3 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. झारखंडमधूनदेखील (jharkhand) मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. नोएडातील एका महिलेच्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आर्थिक व्यवहार आत्ताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका बंद

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना

केंद्र सरकारने (Central Government) मंकीपॉक्सचा (Monkeypox) संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला 21 दिवस वेगळे राहणे आवश्यक आहे.

याचे कारण म्हणजे मंकीपॉक्सचा इन्क्यूबेशन पीरियड 21 दिवसांचा असतो. याशिवाय मास्क (Mask) घालणे बंधनकारक आहे. मंकीपॉक्सने प्रभावित त्वचा पूर्णपणे झाकून ठेवणे महत्वाचे असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या