Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदहावी मुल्य मापनासाठी मार्गदर्शक पोर्टलची सुविधा

दहावी मुल्य मापनासाठी मार्गदर्शक पोर्टलची सुविधा

नाशिक । Nashik

करोनामुळे सर्वच परिक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यापूढे प्रश्नचिन्ह उभा राहील आहे. दहावीचा निकाल कसा लावणार, त्यासाठी मुल्यमापन कशा पद्धतीने होईल, याबाबत पालकांसह शिक्षकांमध्येही प्रचंड संभ्रम होता.

- Advertisement -

त्यावर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल लावण्याच्या दृष्टीने एक पोर्टल तयार केले आहे. त्याद्वारे मुल्यमापनाची पद्धत कशी असेल याविषयी माहीती जारी करण्यात आली आहे.

विद्यार्थांचे अंतर्गत मुल्यमापन करुन शाळांना गुण द्यायचे आहे. गुण देताना आलेल्या शंकांचे निरसन यासंदर्भात मंडळातर्फे जारी सुचना पत्रात मार्गदर्शनासाठी शिक्षण मंडळाच्या विभागीय स्तरावर हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. त्या क्रमांकावर शिक्षक व मुख्याध्यापकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले

नाशिकसह विभागीय मंडळांमध्ये हेल्पलाईनची सुविधा सुरु राहणार मुल्यमापनाद्वारे विद्यार्थांचे लवकरच निकालपत्र तयार होवून यात परिक्षेसाठी नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी, पुर्नपरिक्षार्थी, खाजगी प्रविष्ट झालेले विद्यार्थी यांचा लवकरच निकाल जाहीर केला जाणार आहे.

मुल्यमापनासाठी विद्यार्थाना गृहपाठ .

ज्या शाळांनी दहावी पूर्वपरिक्षा घेतली आहे, त्या विद्यार्थांचे गुण मुल्यमापनात धरले आहे.ज्या शाळांनी पूर्वपरिक्षा घेतली नाही त्या विद्यार्थांच्या अंतर्गत शाळेकडुन गृहपाठ दिला जाणार आहे. याशिवाय नववीच्या वर्षातील व चालु शैक्षणिक वर्षातील उपस्थिती विचारात घेण्यात येईल.त्यामुळे आत विद्यार्थानी मिळालेल्या सुचना नुसार लवकर आपापले गृहपाठ जमा करुन द्यावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या