Thursday, April 25, 2024
Homeनगरगुहा पाटाजवळ अपघातात तीन जण जागीच ठार

गुहा पाटाजवळ अपघातात तीन जण जागीच ठार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) गुहा गावाजवळील (Guha Village) गुहापाटाच्या पुढे चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये (Accident) तीन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. एकेरी वाहतुकीमुळे समोरासमोर झालेल्या या अपघातात (Accident) ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा (Woman) समावेश आहे. काल गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दहा जण जखमी (Injured) झाल्याचे वृत्त होते.

- Advertisement -

शिर्डीहून (Shirdi) शिंगणापूरकडे (Shingnapur) साईभक्तांना घेऊन जाणारी भाडेपट्ट्याने चालणारी क्रूजर (क्रमांक- एमएच 20 इजी 1402) व नगरहून मनमाडकडे (Nagar-Manmad) जाणार्‍या कंटेनर (क्रमांक एचआर 45 बी 4470) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात (Accident) झाला. यामध्ये दोन दुचाकीही सापडल्या. क्रुझरमध्ये महिला भाविक प्रवास करत होत्या. अपघात इतका भीषण होता की क्रुझर गाडीचा चक्काचूर झाला आहे.

या महामार्गाचे सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक चालू होती. कंत्राटदाराने कुठेही मार्गदर्शक फलक लावलेला नाही. रात्री चालकांसाठी रेडियम पट्टी लावलेल्या नाही. त्यामुळेच हा अपघात (Accident) झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर चालक पसार झाला.

या अपघातात एक दुचाकीस्वार दोन्हीही गाड्यांमध्ये सापडल्यामुळे त्याने आपला जीव वाचविण्यासाठी दुचाकीवरून उडी मारली. त्यामुळे फक्त पायाच्या दुखापतीवर निभावले आहे. अपघाताची खबर मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, सोमनाथ कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, विवेकानंद नर्सिंग होम, इतर ठिकाणी तातडीने हलवण्यात आले. अंधार झाल्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण झाले. विविध ठिकाणाहून रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूंनी सुमारे तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे रात्री बराच वेळ नगर-मनमाड रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. अपघातातील जखमींची संपूर्ण माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या