Wednesday, April 24, 2024
Homeनगरपाडव्याच्या मुहूर्तावर इंधन दरवाढ

पाडव्याच्या मुहूर्तावर इंधन दरवाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. एक दिवसाच्या खंडानंतर शनिवारी पाडव्याच्या (Gudipadawa) दिवशी इंधनाचे दर (Fuel Price) गेल्या दहा दिवसात नव्यांदा वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल (Petrol) प्रतिलिटर 84 पैसे आणि डिझेल (Diesel) प्रतिलिटर 83 पैशांनी महागले आहे. नव्या दरवाढीनुसार, नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) पेट्रोल प्रतिलिटर 117.52 रुपये आणि डिझेलेने शतक पूर्ण करत 100.24 रुपये प्रतिलिटर झाले आहे.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, दहा दिवसातील ही नववी दरवाढ आहे. काल पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे आणि डिझेल प्रतिलिटर 83 पैशांनी महागले आहे. यापूर्वी, पेट्रोलियम कंपन्यांनी 22 मार्च, 23 मार्च, 25 मार्च, 26 मार्च, 27 मार्च, 28 मार्च, 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली होती. 1 एप्रिलला खंड देत पुन्हा पाडव्याच्या दिवशी इंधन दरवाढ केली. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असून, पेट्रोलियम कंपन्या त्याचा भार ग्राहकांवर टाकत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे इंधन दरांत सातत्याने वाढ केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात जवळपास साडेचार महिने स्थिर राहिल्यानंतर 22 मार्च रोजी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. त्यानंतरच्या दहा दिवसात 1 एप्रिल वगळता दररोज दरवाढ सुरू आहे. यामुळे 93 रुपये प्रती लिटर असणार्‍या डिझेलने शतक पूर्ण केले आहे. तर 110 रुपये असणारे पेट्रोल 117.52 रुपये प्रती लिटरवर पोहचले आहे.

इंधन वाढ ही सर्वांसाठी त्रासदायक आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांना बसत आहे. वाढत्या इंधन दरवाढीचा कोणताच फायदा इंधन विक्री करणार्‍या पंप चालकांना होत नाही. आजही पंप चालकांना जून्याच दराने कमिशन मिळत आहे. मात्र, पंप चालकांची गुंतवणूक दीड पट झाली आहे.

– चारूदत्त पवार, अहमदनगर जिल्हा पेट्रोलीयम डिलर संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या