Wednesday, April 24, 2024
Homeनगरपेरु उत्पादकांनी टिकवण क्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र अवगत करावे - डॉ. गुप्ता

पेरु उत्पादकांनी टिकवण क्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र अवगत करावे – डॉ. गुप्ता

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

पेरू फळाची टिकवण क्षमता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पेरु उत्पादकांनी नवे तंत्र समजून घेऊन त्याचा वापर करावा, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील एनआयपीजीआर नवीदिल्लीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जगदिश गुप्ता यांनी केले.

- Advertisement -

बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रात आयोजित पेरु पिकांची टिकवण क्षमता वाढ याविषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. जगदिश गुप्ता बोलत होते. यावेळी पेरू उत्पादक संघाचे विनायक दंडवते, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे, पेरू उत्पादक सदाशिव रोहोम, म्हसुपाटील सदाफळ, बी. डी. करमासे, मनोज सदाफळ, पाडुरंग भातोडे, लक्ष्मन लुटे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेरु पिकांमध्ये साठवणूक आणि टिकवण क्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे, असे डॉ. जगदिश गुप्ता यांनी सांगून पेरु पिकांच्या टिकवण क्षमता वाढीसाठी एनआयपीजीआर नवी दिल्ली यांच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान उपलब्ध आहे. प्रिकुलिंग तंत्राद्वारे पेरूची टिकवण क्षमता ही 5 ते 10 दिवस वाढविता येते. यामुळे निर्यात वाढीबरोबरच फळांचे आयुष्य वाढते आणि त्याद्वारे पेरू उत्पादकांना जास्तीचे पैसे उत्पादकांना मिळू शकणार आहे. तांत्रिक पद्धतीचा वापर केल्यास 10 किलोपासून थेट एका टनापर्यंत टिकवण क्षमता यामुळे वाढवता करता येऊ शकते.हे उपलब्ध तंञज्ञान शेतक-यांनी अवगत करावे. विविध पध्दतीने टिकवण कशी करावी यांची माहीती त्यांनी दिली.

प्रारंभी केंद्राचे उद्यान विद्याविभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे यांनी पेरु लागवडीचा आढावा घेत काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि साठवणूक यावर मागदर्शन केले तर विनायक दंडवते यांनी पेरू उत्पादकांनी एकत्र येत या तंत्राचा वापर या हंगामात करावा यासाठी पेरू उत्पादक संघ आपणांस मद्दत करेल, असे सांगितले. यावेळी केंद्राचे शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे, भरत दंवगे, शैलेश देशमुख, अनुराधा वांढेकर, डॉ. विठ्ठल विखे, कैलास लोढे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या