Thursday, April 25, 2024
Homeनगरपेरु पिकाने दिली शेतकर्‍यांला उभारी

पेरु पिकाने दिली शेतकर्‍यांला उभारी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

शेती परवडत नाही, असे रडगाणे गाणार्‍यांना हंगा येथील युवा शेतकरी दत्ता शिंदे व त्याच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर देत अवघ्या 25 गुठ्यांत 250 पेरुचे झाडे लावून वर्षाच्या आत लाख रुपयाचे उत्पन्न घेतले.

- Advertisement -

हंगा सुपा हा परिसर तसा औद्योगिक वसाहतीने व्यापला आहे. औद्योगिक वसाहतीमुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आल्याने या परिसरातील शेतकरी भुमिपुत्रांनी या कामगार वर्गाच्या गरजा पाहून विविध व्यावसाय निवडले तर काहीनी खोल्या दुकाने भाड्याने देत दोन पैसे कमवण्यावर भर दिला तर काहीनी जमीनी भंगारवाले गोडावूनसाठी भाड्याने दिल्या. याला कारण फक्त एकच शेती परवडत नाही, शेतीला मजुर मिळत नाही व शेतात काम न करता चार पैसे आरामात महिन्याला सुरक्षित मिळतात हीच मानसिकता बाळगुन अनेकांनी काळीआईशी नाते तोडले आहे.

परंतु या परिसरात काही शेतकरी आजही आशे आहेत. जे आपल्या मातीशी इमान राखुन आहेत. याच औद्योगिक वसाहतीत हंगा येथील दत्ता शिंदे व त्याच्या परिवाराने आपली काळीआई इतरांकडे गुलाम न ठेवता स्वतः कसून मेहनत घेऊन या मातीतुन सोने पिकवले आहे. शिंदे यांनी फक्त 25 गुठ्यात पेरुची तायवान जातीची 250 झाडे लावली. शेणखतासह सेंद्रिय पद्धतीचा जास्त वापर केल्याने उत्पादन खर्च खुप कमी केला. झाडाची पेरुबागेची चांगली निगा राखल्याने फक्त सात आठ महिन्यांत फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली.

ठोक विक्रीला 60 ते 80 रुपये किलोला दर मिळाला तर फळाचा दर्जा गोडी सर्वोत्तम असल्याने किरकोळ विक्रीला 70 पासून 100 रुपये दर मिळत आहे. 25 गुंठे जमीनत एका सिजनला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. ऐकीकडे तरुण पिढी बिघडत आहे. काम धंदे न करता उडाळक्या मारत फिरत असताना शिंदे व त्यांच्या बंधूने माळराणावर सोने पिकवले आहे. याकामी त्याच्या मातोश्री त्यांना लाख मोलाची मदत करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या