Monday, April 29, 2024
HomeनाशिकNashik News : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा; पालकमंत्री भुसेंचे आवाहन

Nashik News : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा; पालकमंत्री भुसेंचे आवाहन

नाशिक | Nashik

भगवान विश्वकर्मा (Lord Vishwakarma) हे विश्वाचे निर्माता आणि पहिले शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विश्वाचे पहिले वास्तुविशारद, कारागीर आणि अभियंता आहेत. याच भगवान विश्वकर्माच्या नावाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (Pradhan Mantri Vishwakarma Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी वर्गाला कुशल तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासह विद्यावेतन दिले जाईल. तसेच दोन लाख रुपयांचे कर्ज सवलतीच्या व्याजासह देण्यात येईल. यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dadaji Bhuse) यांनी केले आहे.

- Advertisement -

Abdul Sattar : कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा; मंत्री सत्तारांचे पणन आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

यावेळी भुसे म्हणाले की, मंत्रिमंडळ समितीने १३ हजार कोटी रुपये खर्चाच्या ‘पीएम विश्वकर्मा’ या योजनेला पाच वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी दिली. प्रशिक्षितांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात येईल. यातून विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे १४० जातींना याचा फायदा होणार आहे. देशातील कारागीर शिल्पकार तसेच इतर नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आयुष्याला कलाटणी देणारी योजना असणार आहे. यामुळे कष्टकरी वर्गाने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बंद; व्यापारी संपावर, ‘हे’ आहे कारण

पुढे ते म्हणाले की, कारागीर कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यात कौशल्य असणे आवश्यक आहे. अनेक वेळा कारागीरांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही आणि जे अनुभवी आहेत त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच सरकारने ‘विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कारागीरांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत. प्रशिक्षण व मदत मिळाल्यानंतर विश्वकर्मा समाजातील लोक आर्थिक- दृष्ट्या मजबूत होऊन समाज व देशाच्या प्रगतीला हातभार लावतील. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार तसेच कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देवून जागतिक मूल्य साखळीशी जोडले जाणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

Rahul Gandhi : महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा पण ओबीसी समाजाला…; राहुल गांधींची लोकसभेत मोठी मागणी

तसेच दरवर्षी सुमारे पंधरा हजार नोकऱ्या या योजनेतून उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती भुसे यांनी दिली. ते म्हणाले की, आर्थिक वृद्धी आणि स्थिरता येऊन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान विश्वकर्मा समाजाचे आहे. हे दायित्व समोर ठेवूनच शासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला. योजनेअंतर्गत कारागिर तसेच शिल्पकार यांच्यासाठी बेसिक अणि अॅडव्हान्स अशा दोन प्रकारच्या कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील. निधी, मान्यता, प्रशिक्षण, उत्पन्न आणि इतर अनेक आव्हाने यांच्या अभावामुळे अनेक कारागीर कुटुंबे त्यांचा व्यवसाय आणि कलेपासून दूर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा योजना महत्त्वाची ठरेल. या योजनेचा समाज बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि समाजाचा विकास करून घ्यावा असे आवाहन यावेळी भुसे यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण; पाहा Video

- Advertisment -

ताज्या बातम्या