Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपोलीस स्मृती दिन : पालकमंत्री भूसेंनी केले शहीद पोलिसांना अभिवादन

पोलीस स्मृती दिन : पालकमंत्री भूसेंनी केले शहीद पोलिसांना अभिवादन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशाच्या प्रती आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन पाळला जातो. या स्मृती दिनानिमित्त राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी आज नाशिक पोलीस आयुक्तालय, पोलीस कवायत मैदान येथे पोलीस स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले..

- Advertisement -

यावेळी आमदार हिरामण खोसकर, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

‘सारथी’तून सरकारी योजना कृतीत आणाव्यात : एकनाथ शिंदे

यावेळी बोलतांना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, 21 ऑक्टोबर, 1959 रोजी लडाख येथे हॉटस्प्रिंग या ठिकाणी केंद्रिय राखील पोलीस दलातील 10 शिपायांच्या तुकडीवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला होता.

Video : सिन्नर तालुक्यात पावसाचा कहर; शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

या 10 शूर शिपायांनी शत्रुशी निकराने लढा देत देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्या वतीने स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. या शब्दात पालकमंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी आजच्या दिवसाचे महत्व विषद केले. यावेळी मैदानावर उपस्थित पोलीस दलातील कर्मचारी यांनीही शहिदांना मानवंदना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या