Wednesday, April 24, 2024
Homeजळगावज्वारी, बाजरी, मक्याला हमीभाव ; नाव नोंदणीसाठी ही आहे मुदत

ज्वारी, बाजरी, मक्याला हमीभाव ; नाव नोंदणीसाठी ही आहे मुदत

अमळनेर – प्रतिनिधी amalner

शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनतर्फे (Marketing Federation) भरड धान्य खरेदीसाठी १५ ऑक्टोबर नावे नोंदणीची अंतिम मुदत असून ज्वारीसाठी २९७० रुपये, बाजरीला २३५० रुपये आणि मक्याला १९६२ रुपये हमी भाव जाहीर झाला आहे.

- Advertisement -

जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील १६ केंद्रांना भरड धान्य खरेदीची परवानगी मिळाली आहे.

अशी करा नाव नोंदणी

नावे नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा लावलेल्या पीक पेऱ्याचा सात बारा उतारा तसेच चालू असलेल्या बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स अथवा रद्द केलेला धनादेशाची प्रत, आधार कार्ड झेरॉक्स व भ्रमणध्वनी क्रमांक एनईएमएल पोर्टलवर ऑनलाईन नोंदवायची आहे. एका पेक्षा जास्त बँक खात्यांसाठी एकाच शेतकऱ्यांची नोंद असू नये अथवा शेतकऱ्याच्या नावेच असलेल्या बँक खात्याची नोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापक संजय पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या