Friday, April 26, 2024
Homeनगरजीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचा देशपातळीवर सन्मान

जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचा देशपातळीवर सन्मान

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा (Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Sahakari Sugar Factories) केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा (Regular payment in GST tax system) केल्याबद्दल सीबीआयसी विभागाचे अध्यक्ष एम. अजित कुमार (CBIC department president M. Ajit Kumar) यांनी सर्टिफिकेट ऑफ अ‍ॅप्रोप्रिएशन बेस्ट अवॉर्ड (Certificate of Appropriation Best Award) प्रमाणपत्र देऊन सन्मान केला असल्याची माहिती अध्यक्ष बिपीन कोल्हे (Bipin Kolhe) यांनी दिली. राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त करणार्‍या कारखान्यात संजीवनीचा (SanjivanI) समावेश आहे.

- Advertisement -

बिपीन कोल्हे (Bipin Kolhe) म्हणाले, माजीमंत्री शंकरराव कोल्हे (Shankarao Kolhe) यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी साखर कारखान्याने (Sanjivani Sugar Factory) प्रत्येक हंगामातील संकटावर मात करीत यशस्वी मार्गाक्रमण सुरु ठेवले आहे. थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol production) करणारा देशातील पहिलाच सहकारमहर्षी कोल्हे कारखाना आहे. केंद्र शासनाने (Central Government) 2017 पासून जीएसटी करप्रणाली लागू केली तेव्हापासून ते 31 मार्च 2021 पर्यंत सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याने यात अत्यंत सूक्ष्म माहितीचे संकलन करून संगणकीय पद्धतीने विहीत नमुन्यात वेळेत जीएसटी (GST) भरून शासनास सहकार्य केले आहे.

त्याबद्दल भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाचे सीबीआयसीचे अध्यक्ष एम. अजितकुमार यांनी हे प्रमाणपत्र देऊन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कार्याचा गौरव केला आहे. या पुरस्कारात (Award) कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी (Sugarcane supplier farmers) सर्व आजी माजी संचालक मंडळ, व्यवस्थापन प्रमुख, तत्सम बांधव, लेखा विभागाचे सर्व पदाधिकारी, व्यवस्थापन कर्मचारी वर्ग, लेखापरीक्षक, व्यापारी आदि ज्ञात अज्ञात घटकांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हे कारखान्यास आजवर शासकीय-निमशासकीय स्स्तरावरील वीस विविध पारितोषिके मिळालेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या