Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याGST Council Meeting : ऑनलाईन गेमिंग महागणार; २८ टक्के जीएसटी लागणार

GST Council Meeting : ऑनलाईन गेमिंग महागणार; २८ टक्के जीएसटी लागणार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंगला झटका दिला आहे यातील निर्णय म्हणजे, जीएसटी परिषदेने ऑनलाइन गेमिंग, घोडेस्वारी आणि कॅसिनोवर 28% कर लागू करण्यास मान्यता दिली. यापूर्वी यांवर 18 टक्के कर होता. जीएसटी कायद्यात सुधारणा केल्यानंतर हे नवीन कर लागू होणार आहेत

जरी धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात येणार आहे.

खासगी कंपन्यांच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेलाही जीएसटीमधून सूट देण्यात येणार आहे.

कर्करोगाशी लढणारी औषधे, दुर्मीळ आजारांवरील औषधांना जीएसटी करातून सूट देण्यात येणार आहे.

मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य आणि एलडी स्लॅग वरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात येणार आहे.

कच्चे आणि न तळलेले, वाळवलेले चिप्स आणि तत्सम पदार्थांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात येणार आहे.

सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या