Thursday, April 25, 2024
Homeजळगावकल्याण निधीबाबत ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांचे सुतोवाच

कल्याण निधीबाबत ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांचे सुतोवाच

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

ग.स.सोसायटीच्या (G.S.Society) सभासद कल्याण (welfare fund) निधीतून प्रति सभासद 1 हजार रुपये विमा प्रिमीयम ग.स.सोसायटी अदा करण्याचा निर्णय सहकार, प्रगती आणि लोकसहकार या तिन्ही गटाच्या नेत्यांसह कार्यकारी संचालक मंडळाने सर्वांनुमते घेण्यात आला आहे, अशी माहिती ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील (President Uday Patil’s) यांनी दिली.

- Advertisement -

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी जळगाव अर्थात ग.स. संस्थेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षात कोविड 19 मुळे 496 सभासदांचा मृत्यू झाल्याने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचा विचार करून संस्थेने सभासद हिताला प्राधान्य देवून समाजाभिमुख कल्याणकारी योजना राबविण्याच्या उदात्त हेतूने संस्थेने भारत सरकारच्या मान्यता प्राप्त विमा कंपनी भारती लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून सहकार खात्याच्या मंजुरीने गृप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा पॉलिसी रक्कम रूपये 5.0 लाख मात्र सेवेत कार्यरत असलेल्या सभादांची विमा पॉलिसी काढण्यात आलेली आहे.

तथापि विमा पॉलिसीचा प्रिमियम 2596 रुपये प्रति सभासद असलेला दर कमी करण्याबाबत कार्यकारी मंडळानेदि. 26 मार्च रोजी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, लोकसहकार गटाचे नेते सुनील सुर्यवंशी, सहकार गटनेते अजबसिंग पाटील यांच्यासह तिन्ही गटाच्या सर्व संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार सभासद गृप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा पॉलिसीचा प्रिमियम दर 2596 रुपयांपैकी 1000 प्रति सभासदाप्रमाणे एकूण रक्कम 2,70,59,000 रु.मात्र सभासद कल्याण निधी योजनेतून अदा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.

विमा पॉलिसीच्या प्रिमियम पोटी सभासदांच्या वर्गणी खात्यातून कपात केलेली सदरची रक्कम 1 हजार रुपये प्रति सभासद मात्र दि. 31 मार्च 2023 पावेतो पुर्ववत वर्गणी खाती जमा करून सभासदांना आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाने घेवून सभासद हित जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच यासभेच्या पटलावर ठेवलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

सहकार, प्रगती व लोकसहकार या तिन्ही गटाच्या संचालकांनी सखोल व सविस्तर चर्चेअंती विमा प्रिमियम रक्कम 1 हजार प्रति सभासद मात्र सभासद कल्याण निधी योजनेतून अदा करुन सभासदांचे आर्थिक हित जोपासण्याचा एकत्रित निर्णय घेतलेला आहे.

उदय पाटील, अध्यक्ष- ग.स.सोसायटी जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या