Thursday, April 25, 2024
Homeधुळेग.स. बँकेसाठी केवळ 51 टक्के मतदान

ग.स. बँकेसाठी केवळ 51 टक्के मतदान

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी कर्मचार्‍यांची सहकारी बँक म्हणजेच ग.स.बँकेच्या संचालक मंडळासाठी पाचही जिल्ह्यात एकुण 51 09 टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला.

- Advertisement -

धुळे-नंदुरबार-नाशिक-जळगाव-नगर जिल्ह्यातील 18 केंद्रातील 36 बुथवर सकाळी आठवाजेपासून मतदानाला सुरूवात झाली.

जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी दिसून आली. शहरात बाफना हायस्कूल ,शिरपूरात सावित्रीबाई फुले मराठी शाळा, दोंडाईचा नपा शिक्षण मंडळ, साक्रीत जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा,पिंपळनेर जिल्हा परिषद कन्या शाळा क्र.1,शिंदखेड्यात जिल्हा परिषद शाळा क्र.5, नंदूरबारमध्ये सावित्रीबाई फुले शाळा क्र.4, नवापूरला श्री शिवाजी हायस्कूल, शहाद्यात नपा शाळा क्र.16, अक्कलकुवा जिल्हापरिषद केंद्र शाळा क्र.1, तळोदा जिल्हा परिषद शाळा क्र.6, धडगावला जि.प.केंद्र शाळा येथे शांततेत मतदान झाले. कोरोनाच्या नियमांचे पालन करत मतदान प्रक्रिया राबविली गेली. दरम्यान एकुण 51.09 टक्के मतदान झाले. एकुण 11 हजार 267 मतदारांपैकी केवळ 5 हजार 756 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान ग.स.बँक आंदोलनाचे प्रमुख माजी संचालक राजेंद्र शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रेमानंद उपाचार्य, संगिता आव्हाड, सुनिता लोंढे, विनोद मोहळ, सविना शेख, सिमा शेख यांनी निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर होत असल्याचा आरोप करत या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ग.स.बँकेच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनल विरुध्द अपक्ष अशी लढाई होत आहे.

निरूत्साह, बोगस मतदानाचा आरोप

आजच्या निवडणूकीवर प्रमुख विरोधी उमदेवारांनी बहिष्कार घातलेला असतांना संपुर्ण पाच जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांमध्ये प्रचंड निरूत्साहाचे वातावरण दिसून आले.

आजच्या मतदान प्रक्रियेत बँकेच्या यंत्रणेचा व कर्मचार्‍यांचा दुरूपयोग करून साधारण 30 टक्कयांपेक्षा अधिक बोगस मतदान करून घेतले असल्याचा आरोप ग.स.बँक आंदोलनाचे प्रमुख माजी संचालक राजेंद्र शिंत्रे यांनी केला आहे. तसेच त्यांनी अशा अपप्रवृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या