Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसर्पदंशाच्या रुग्णांचा वाढता आलेख

सर्पदंशाच्या रुग्णांचा वाढता आलेख

नाशिक । वैभव कातकाडे

पावसाळा (Rainy Season) सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी (Rain Water) सापांनी (snakes) तयार केलेल्या बिळांमध्ये पाणी शिरते. परिणामी साप आणि नाग (Snakes and serpents) बाहेर पडून अन्न शोधत असतात. त्यामुळे सर्पदंशाचे (snakebite) प्रकार बघायला मिळतात. जिल्हा रुग्णालयात (District Hospital) आलेल्या रुग्णांपैकी (Patients) अनेकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता एकूण ३२२ सर्पदंशाचे रुग्ण (Snakebite Patients) दाखल झाले होते. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे जून म्हणजेच पावसाळ्यात दाखल झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नदी, नाले वाहू लागले असताना जमिनीमध्ये देखील पाणी मुरत आहे. त्यामुळे बिळांमध्ये पाणी शिरल्याने अडगळीच्या विसाव्याला असलेले साप बिळाबाहेर पडत आहेत. त्यामुळे सर्पमित्रांना पकडण्यासाठी बोलविण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच घरगुती उपचार न करता तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे. घरगुती उपचार करू नये, शेतातील कामे करताना किंवा रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना बॅटरीचा वापर करावा, तसेच साप दिसल्यास सर्पमित्राशी (snake charmer) संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्रांकडून केले जात आहे.

सर्पदंश झाल्यावर तातडीचा उपचार

सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच अनेकजण घाबरून जातात, त्यामुळे प्रकृती अधिक बिघडते. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम रुग्णाला जवळ्याच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करावे. घराच्या घरी उपचार करू नये, जखम जंतुनाशक औषधाने धुवावी.

औषध साठा उपलब्ध

सर्पदंशावरील औषध साठा उपलब्ध जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरील औषध साठा उपलब्ध आहे. सर्प देश झालेल्या रुग्णावर तत्काळ उपचार करण्यात येतात, असे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

सर्पदंशांबाबत असलेले अज्ञान आणि घाबरुन दंश झाल्यानंतर अनेकजण तेथे करकचून बांधून ठेवतात, हे चुकीचे आहे . असा प्रकार लक्षात येताच पाणी किंवा अन्नपदार्थ सेवन करणे टाळावे. तसेच तातडीने प्राथमिक रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत

एम. व्ही. जाधव, इन्चार्ज, इमर्जन्सी विभाग, जिल्हा रुग्णालय

- Advertisment -

ताज्या बातम्या