Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यागट-गण प्रारूप आराखडा काम आजपासून

गट-गण प्रारूप आराखडा काम आजपासून

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Comnmission )दिलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप आराखडा (Draft outline) तयार करण्याचे काम आजपासून (दि.23) सुरू होणार आहे. 27 जूनला अंतिम आराखडे जाहीर होणार आहेत.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाच्या ( OBC Reservation )मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गण प्रारूप आराखड्यांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. गट व गणांचे प्रारूप आराखडे मान्य करण्याचे अधिकार आता विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात तयार करण्यात आलेला गट-गण प्रारूप आराखडा रद्द करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात 4 मेस निकाल देताना आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. निवडणुका लांबणीवर पडत असल्याने गट-गणांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम संथगतीने सुरू होते. 27 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकार्‍यांना गट-गणांचा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली.

राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम थांबवण्यात आले होते. दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे सुधारित आदेश काढले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आराखडे तयार करून विभागीय आयुक्तांकडून अंतिम मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या