ग्रीन फिल्ड महामार्गाच्या भुसंपादनाला राहुरीच्या शेतकर्‍यांचा विरोध

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सुरत, नाशिक, अहमदनगर, हैदराबाद ग्रीन फील्ड राष्ट्रीय महामार्गाची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना हाथ हलवत परत जाण्याची वेळ आली. दिनांक 14 जुलै रोजी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे काही अधिकारी व कर्मचारी या ग्रीन फील्ड महामार्गाची मोजणी करण्यासाठी आले होते. यावेळी शेतकर्‍यांनी तिव्र विरोध केल्यामुळे मोजणी स्थगीत करण्यात आली.

प्रस्थावीत महामार्गाची भूसंपादन प्रकिया सुरु करण्यात आली असून त्या दृष्टीने राहुरी खुर्द येथील शेतकर्‍यांना आठ दिवसापूर्वी संपादीत जमीन मालकांना मोजणी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिनांक 14 जुलै 2023 रोजी नायब तहसीलदार संध्या दळवी, तलाठी तुषार काळे तसेच सर्व भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी हे मोजणी करण्यासाठी आले होते. तेव्हा शेतकर्‍यांनी मोजणी करण्यास विरोध केला. नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी शेतकर्‍यांना मोजणी करून द्यावी व त्यानंतर आपल्या मागण्या शासनास कळवून योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या आपण जमीन मोजणी करु द्यावी. असे सांगितले.

परंतु शेतकर्‍यांनी या अगोदरही कृषी विद्यापीठ, मुळा धरण, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आदि ठिकाणी आमच्या जमीनी गेल्या असून त्याचे पुन:र्वसन अजून झाले नाही. आता अगदी कमी जमीनी शिल्लक राहिल्या असून जमीन मोजणी स्थगीत करावी. शासनाने पोलीस अगर शासकीय यंत्रणेच्या बळाचा वापर केल्यास आम्ही आमच्या कुटुंबासह देहत्याग करू असे सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन पाठविण्यात आले. यावेळी अशोक तोडमल, राजेंद्र शेडगे, अण्णासाहेब शेडगे, सुरेश तोडमल, मुकुंद शेडगे, वैभव शेडगे, बाबासाहेब शेडगे, बाबासाहेब धोंडे आदिं सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *