Saturday, April 27, 2024
Homeनगरग्रिन अ‍ॅण्ड क्लिन शिर्डी फाउंडेशनची गिनीज बुकात नोंद

ग्रिन अ‍ॅण्ड क्लिन शिर्डी फाउंडेशनची गिनीज बुकात नोंद

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

स्वच्छता, पर्यावरण आणि वृक्षारोपण कार्यक्रमात स्वतःला वाहून घेतलेल्या शिर्डी शहरातील ग्रिन अ‍ॅण्ड क्लिन फाऊंडेशन

- Advertisement -

या सामाजिक संस्थेच्या कार्याची दखल लंडन येथील गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली असून सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र गंगागिरी महाराज देवस्थान सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते गिनीज बुकात नोंद झाल्याबाबतचा पुरस्कार देऊन ग्रिन अ‍ॅण्ड क्लिन शिर्डी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.

शिर्डी शहरात मागील सहा वर्षांपासून स्वच्छता जनजागृती, पर्यावरण, वृक्षारोपण करून संस्थेने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. शिर्डी शहरातील महत्त्वाच्या मार्गावर अकरा हजार वृक्षलागवड करून सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखभाल करत संवर्धन केले आहे. त्यामुळे शिर्डी शहराच्या सुंदरतेत भर पडली आहे.

साईबाबांच्या पदकमलांनी पवित्र झालेल्या निमगाव निघोज तसेच रुई, साकुरी हद्दीतील 15 कि. मी. परिक्रमा मार्गावरून महापरिक्रमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचीही दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली व ग्रिन अँड क्लिन शिर्डी फाउंडेशनचा यथोचित सन्मान करण्याचे ठरवले. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठा कार्यक्रम रद्द करून श्रीक्षेत्र सराला बेटावर महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

दरम्यान शिर्डीत सदगुरू गंगागिरी महाराज यांचा 171 वा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. यावेळी भाविकांनी दिलेल्या देणगीतून उरलेल्या रकमेची सराला बेट येथे साई शताब्दी आश्रम ही भव्यदिव्य वास्तू उभारण्यात आली. या वास्तुच्या अवतीभोवती वृक्षारोपण करण्याची जबाबदारी ग्रिन अँड क्लिन संस्थेने घेतली असून त्याची प्रत्यक्षात महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे स्वागत तसेच शताब्दी आश्रमाची माहिती सप्ताह कमिटीचे सदस्य कमलाकर कोते यांनी दिली.

प्रास्ताविक अ‍ॅड.अनिल शेजवळ यांनी केले. संतपूजन सप्ताह कमिटीचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर, रमेश गोंदकर, सुनील पारख, बाबासाहेब कोते यांनी केले. यावेळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार महंत रामगिरी महाराज तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे लंडन येथील महेश वैद्य यांच्या हस्ते अजित पारख, ताराचंद कोते, सचिन तांबे, गोपीनाथ गोंदकर, संजय शिर्डिकर यांनी स्विकारला. याप्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनी ग्रिन अँड क्लिनच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मनिलाल पटेल यांनी केले. यावेळी शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या