Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिंडोरी : यंदा द्राक्ष हंगाम उशीरा सुरू होणार

दिंडोरी : यंदा द्राक्ष हंगाम उशीरा सुरू होणार

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे हंगाम यंदा उशीर सुरू होण्याची चिञ निर्माण झाले आहे.

- Advertisement -

कारण हवामानातील बदल व परतीचा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाची व्दिधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशीरा चालू होण्याची माहिती शेतकरी वर्गाकडुन मिळत आहे.

जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्याला ग्रीन झोन व द्राक्षे पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु यंदा वातावरणातील बदल, करोनाचा फटका द्राक्ष बागांना बसणार आहे. मागील वर्षी अव्वाच्या सव्वा पाऊस पडल्याने द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला द्राक्षे हंगाम घेताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती.

यंदा करोना व हवामानाचा बदलाव, निसर्गाची अवकृपा व अपुरे भांडवल यामुळे शेतकरी वर्गाला यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा अशी व्दिधा अवस्था निर्माण झाल्याने तालुक्यातील द्राक्षे हंगाम उशीरा चालू होईल असे चिञ सध्या तालुक्यात दिसत आहे.

परतीच्या पावसाने थैमान घातल्याने अनेक द्राक्षे बागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. बागांमध्ये तण निर्माण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर छाटणी ची पुर्व तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते.

परंतु सप्टेंबर महिना संपत आला असतांना सुध्दा तालुक्यातील अनेक शेतकरी बागांच्या तयारीला लागले नाही. काही शेतकऱ्यांनी करोना संकटाला न जुमानता द्राक्षे हंगाम घेण्यासाठी तयारी दाखविली आहे.

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे देशाच्या अनेक राज्यांमध्ये जातात. परंतु यंदा करोना, लाॅक डाऊनची स्थिती, वातावरणातील बदल, परतीचा पाऊस, अपुरे भांडवल यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

– जयदिप देशमुख, द्राक्षबागायतदार

- Advertisment -

ताज्या बातम्या