Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकद्राक्ष निर्यात प्रोत्साहन अनुदान सुरू करावे- आ. बनकर

द्राक्ष निर्यात प्रोत्साहन अनुदान सुरू करावे- आ. बनकर

पालखेड मिरचिचे। वार्ताहर

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करून शेतकरी आपले द्राक्ष विविध देशामध्ये विक्रीसाठी पाठवितात. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक सुलभता निर्माण होते. या निर्यातक्षम द्राक्ष पाठविणेसाठी केंद्र शासनाने प्रति कंटेनर रक्कम 80 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान सुरु केलेले होते. त्यामुळे पर्यायी शेतकर्‍यांच्या नफ्यात वाढ होत होती. परंतु चालू वर्षाच्या हंगामात केंद्र शासनाने सदर प्रोत्साहन अनुदान बंद केले.

- Advertisement -

यामुळे द्राक्ष निर्यात कमी होऊन द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना त्यांनी केलेल्या खर्चाच्या प्रमाणात उत्पन्न मिळणार नाही. स्थानिक बाजार पेठामध्ये जास्त प्रमाणात द्राक्षाची आवक वाढल्याने द्राक्ष बाजारभाव कोसळले जाऊन शेतकर्‍याला दोन पैसे कमी मिळतील. त्यामुळे केंद्र शासनाने बंद केलेले द्राक्ष निर्यात प्रोत्साहन अनुदान पुन्हा सुरु करावे अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीप्रसंगी केली.

या चर्चेमध्ये पिंपळस, भाऊसाहेबनगर, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, जिव्हाळे, थेरगाव, दात्याणे, दिक्षी, बाणगंगानगर, ओझर या गावातील शेतकर्‍यांना व नागरिकांना आपली वाहने ये-जा करणेकरीता एचएएल कामगार वसाहतीतून परवानगी मिळावी किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या. तसेच तालुक्यातील बहुतेक शिवार रस्ते व वस्ती जोडरस्ते खराब झालेले असल्याने शेतकर्‍यांचा शेतमाल रस्त्यावर आणणे. शिवारात वास्तव्यास राहणार्‍या शेतकर्‍यांना रस्त्याच्याबाबत येणार्‍या विविध अडचणी सोडविण्यासाठी पाणंद रस्त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.

त्याचप्रमाणे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात क्षारयुक्त व केमिकलयुक्त पाण्यामुळे जलप्रदूषण तयार झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाढलेल्या आहे. सदर दूषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना तसेच नदीपात्रातील पानवेली काढण्यासाठी कार्यवाही करावी. शासनाने विजेबाबत राबवित असलेले धोरण निश्चित चांगले आहे. परंतु शेतकर्‍याचे द्राक्ष, कांदा, ऊस या पिकांना काढणीसाठी अवधी असल्याने ट्रान्सफार्मर खराब झाल्यावर बिले भरणेकामी मागणी होत आहे.

शेतकर्‍यांच्या हातात पैसे आल्यावर ते तत्काळ बिले भरतील तो पर्यंत त्यांना अवधी देण्यात यावा आणि नादुरुस्त टार्न्सफार्मर बसविण्यात यावा. तसेच विजेच्या वारंवार येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी ट्रान्सफार्मरची संख्या वाढवावी आदी मागण्या आ. बनकर यांनी मांडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या