Thursday, April 25, 2024
Homeनाशिकद्राक्षशेती तोट्यात : ढिकले

द्राक्षशेती तोट्यात : ढिकले

सिद्धपिंप्री। वार्ताहर | Siddhapimpri

आज द्राक्ष बागायतदार (Grape growers) इंडस्ट्री (Industry) मध्ये बाजारभावावरून बर्‍याच प्रतिक्रिया उमटल्या असून यात द्राक्षांची प्रति किलो 25 रु., 30 रु., 35 रु., 40 रु. किलो या भावाने विक्री होत आहे. परंतु या दरात द्राक्षावर (Grapes) झालेला खर्चच निघत असून द्राक्षपिकावर नफा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे द्राक्षपीक (Grape crop) घ्यावे की नाही या विचाराप्रत शेतकरी (farmers) आला आहे.

- Advertisement -

एकेकाळी हमखास दोन पैसे मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जात होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून प्रतिकूल हवामान (Adverse weather), बनावट औषधे, अवकाळी पाऊस (Untimely rain), गारपीट आदींचा सामना करीत द्राक्षपीक घेतले तर त्याच्या बाजारभावाची हमी नाही.

त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना आता याबाबत विचार करण्याची गरज आहे. तसेच द्राक्ष उत्पादनावरील खर्च कमी झाला पाहिजे याकडेही शेतकर्‍याला लक्ष देण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी संघटनेचे (Shankar Dhikle) शंकर ढिकले (Shankar Dhikle) यांनी म्हटले आहे.

बाजारपेठेत द्राक्षांना मागणी नसतांनाही आपण मोठ्या प्रमाणात द्राक्ष पाठवतो. आठ ते दहा लोकांचे कुटुंब असलेल्या शेतकर्‍याला पाच ते सात एकर द्राक्षबाग असेल तर तेवढ्या क्षेत्रामध्ये नोकरदार पेक्षा चांगल्या पद्धतीने अगदी दिमाखात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो आणि असं काय जगण्यासाठी लागते. पाच-सात एकर स्वतःची शेती, एक बंगला. एक चाकी गाडी आणि दोन औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर (tractor) अगदी व्हीआयपी पद्धतीने तो स्वतःचे जीवन जगू शकतो.

बेसुमार द्राक्षबागा लावून आपणच आपले करियर खराब करत चाललो आहे आणि पुढच्या पिढीला देखील आपण यामध्ये नकळत या प्रवाहात ओढून द्राक्ष शेती करावयास लावून कर्जबाजारी करण्यास कारणीभूत ठरत आहोत.

द्राक्ष शेतीसाठी बँकांनी केलेला भरमसाठ कर्जपुरवठा यामुळे शेतकरी उत्पन्नापेक्षा खर्चाकडे जास्त लक्ष देत असून पीक कोणत्या हंगामात घ्यावी याचे योग्य नियोजन करणे काळाची गरज असून शेतकर्‍यांनी कमी क्षेत्रात द्राक्षबागा लावून त्याचे योग्य नियोजन करावे. भाव नसेल अशावेळी कोल्ड स्टोअरेज मध्ये द्राक्षाची साठवणूक करणे गरजेचे असल्याचे ढिकले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या