Friday, April 26, 2024
Homeजळगावशिवपुतळा मिरवणूक काढणे पडले महागात : आजी - माजी लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल

शिवपुतळा मिरवणूक काढणे पडले महागात : आजी – माजी लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे आगमन व स्वागतानिमीत्त मिरवणूक काढतांना २०० लोकांपेक्षा जास्त जणांचा जनसमुदाय एकत्र येणार नाही अशी अट असतांना मिरवणूक परवानगीच्या अटी शर्तीचा भंग केला म्हणून खासदार, आमदार, नगराध्यक्षा, माजी आमदार व पुतळा आगमन समितीचे सदस्य अशा १८ व इतर अनोळखी ४ ते ५ हजार जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस (Police) ठाण्यात पोलीस हे. कॉ. भटू पाटील यांनी दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

.मिरवणूक काढून अटी व शर्तींचा भंग केला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस नाईक भटू पाटील यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आगमन समितीचे सदस्य घृष्णेश्वर पाटील, (MP Unmesh Patil, MLA Mangesh Chavan) खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, शाम देशमुख,भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, पंचायत समिती सदस्य संजय पाटील, रमेश चव्हाण, सुर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, सदानंद चौधरी आदी १८ व इतर अनोळखी ४ ते ५ हजार जणांच्या विरोधात भादंवि कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ५१बी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे ३७(३)(१) व १३५ प्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या