Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारकंटेनरखाली येवून आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू

कंटेनरखाली येवून आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू

सारंगखेडा Sarangkheda । वार्ताहर

शहादा-दोंडाईचा रस्त्यावर (Shahada-Dondaicha road) बोराडीकडून शहादाकडे येणारी मोटरसायकल (motorcycle )कंटेनरला ओव्हरटेक (Overtake container) करीत असताना समोरुन येणार्‍या मोटारसायकलस्वाराला (motorcycle ) जोरदार धडक (Strong beating) दिल्याने आजोबा व नातवाचा कंटनेरच्या मागच्या चाकाखाली येवून जागीच मृत्यू (Death on the spot) झाल्याची घटना घडली. यात कंटेनर चालक व मोटरसयाकलस्वार जखमी झाला आहे. अनरदबारी-उमीया भोजनालयलगत महावीर कोल्डस्टोरेज समोर आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्नील जगदीश बडगुजर (वय 19) व आजोबा लक्ष्मण माधव बडगुजर (वय 85) हे अ‍ॅक्टिवा (Activa) (क्र.एम.पी.46 एम.डब्ल्यू 0178) या दुचाकीने बोराडीकडून शहादाकडे येत होते. अनरदबारीलगत वळणाच्या पुढे जवळून जात असलेली कंटेनर (क्र.एम.एच. 40 वाय.9113) ला ओव्हरटेक करीत असतानाच शहाद्याकडून फेस गावाकडे हिरो होंडा दुचाकी मोटरसायकलीवर ((motorcycle )) वाहन (क्र.एम.एच.19ए.6849) हे वाहन घेवून राहुल कैलास पाटील (रा.फेस) हा भरधाव वेगाने जात असताना समोरील अ‍ॅक्टिवा वाहनास जोरदार धडक (Strong beating) दिली.

त्यामुळे अ‍ॅक्टिवा चालकाचे नियंत्रण सुटल्याने नातू व आजोबा दोन्ही खाली पडले. त्याच दरम्यान कंटेनरच्या मागील चाकात (rear wheel of the container) आल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू (Death on the spot) झाला आहे. ही घटना उमिया भोजनालयालगत महावीर कोल्डस्टोरेज जवळ घडली. हिरो होंडा चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे त्याचे वाहन देखील बाजूला तीन ते चार वेळा पलटी मारल्याने तो रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. त्यात तो जखमी झाला आहे. जखमी (Injured) राहुल कैलास पाटील याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ (treatment in a private hospital) पाठवण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी, शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक वंदन गिरासे, राजू वळवी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या