Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनिफाडी टोपी घालून आमदार लंके यांचे जंगी स्वागत

निफाडी टोपी घालून आमदार लंके यांचे जंगी स्वागत

येवला | प्रतिनिधी | Yeola

आ. निलेश लंके (MLA Nilesh Lanke) इंदोर (Indore) दौऱ्याहून येत असताना पिंपळगाव जलाल टोल नाका (Pimpalgaon Jalal Toll Naka) येथे जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले…

- Advertisement -

आ. लंके यांच्या कार्याची दखल घेत नुकतेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांना निफाडी टोपी घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी आ. लंके म्हणाले की, जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेची (Jai Bhavani Sanstha) येवला ते तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर सायकल यात्रा जेव्हा नगरमध्ये प्रस्थान करेल त्या वेळेस नक्कीच मी तुमची आवर्जून भेट घेईल.

मागील वर्षी तुमची तुळजापूर सायकल यात्रा नगरमध्ये आली. परंतु माझ्यामागे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आव्हान असल्यामुळे मी तुमची भेट घेऊ शकलो नाही. परंतु यावर्षी तुमची नक्कीच भेट घेईल. संस्थेची जेवणाची व राहण्याची व्यवस्था माझ्याकडे असेल.

तसेच संस्थेची कार्य मिशन दाणापाणी, माझा झाड माझा सेल्फी, वाढदिवसानिमित्त झाडे लागवड, रक्तदान, अवयवदान, तुळजापूर सायकल यात्रेदरम्यान जागोजागी वृक्षारोपणाची पद्धत अशा विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष विजय भोरकडे (Vijay Bhorkade) यांनी आ. लंके यांच्या कोरोना (Corona) महामारीत केलेल्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रंसगी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भोरकडे, सचिव नवनाथ भोरकडे, बाळासाहेब बनकर, किशोर खोकले, किरण खोकले, डॉ. गोरख खुटे, सचिन भोसले, डॉ. वासुदेव साळुंखे, गणेश मोरे, वैभव मोरे, अनिल भोरकडे, नवनाथ भोरकडे, शांताराम भोरकडे, संदीप भोरकडे, मयूर भोरकडे, गणेश खोकले आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या