Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबोधे येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बनले मतदान केंद्र

बोधे येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बनले मतदान केंद्र

नाशिक | प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील बोधे येथे पहिल्यांदाच मतदान केंद्र बनविण्यात आले आहे. येथील गावातील ग्रामस्थ मतदारांनी पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या गावात जाऊन मतदान केले.

- Advertisement -

येथे आल्यानंतर मतदारांना वेगळाच अनुभव घेता आला. यामध्ये मतदान केंद्र फुगे लाऊन सजविण्यात आले होते. गुलाबपुष्पांनी संपूर्ण मतदान केंद्राला वेगळाच फील आलेला होता.

हे मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र या संकल्पनेवर आधारीतआहे. येथील सर्व मतदारांना मतदान केंद्राध्यक्ष यांच्या हस्ते गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत आहे.

यामागचा हेतू मतदार आणि मतदान जनजागृती असा होता. जिल्ह्यातील मोजक्या केंद्रांवर असा उपक्रम राबविण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या