Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकचोरांच्या हाती गाव देण्यापेक्षा पोरांच्या हाती द्या...

चोरांच्या हाती गाव देण्यापेक्षा पोरांच्या हाती द्या…

नाशिक । गोकुळ पवार

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ग्रामीण भागात ऐन थंडीत वातावरण तापले असताना सोशल मीडियावर मात्र वेगळेच वारे पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे, गावोगावी चर्चांना उधाण आले आहे. प्रत्येक 5 वर्षातून येणाऱ्या या निवडणुकीत चढाओढ लागते ती प्रतिष्ठेची. त्यासाठी काहीही झालं तरी चालेल. साम, दाम, दंड आणि भेद या नितीचा मार्ग अवलंबला जातो. परंतु यंदा ‘ चोराच्या हातात गाव देण्यापेक्षा पोरांच्या हातात गाव द्या, विकास नक्की होईल,’ अशा आशय घेऊन सोशल मीडियावर सध्या युवा उमेदवारांच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान लॉक डाऊनमुळे स्थगित केलेल्या असंख्य निवडणुकाकांचा थोड्याच दिवसांत वाजणार आहे. यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या गाव पुढाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवणी करण्यात व्यस्त आहेत.

इकडे सोशल मीडियावर मात्र युवकांना पसंती दिली जात असून गावातील पुढाऱ्यांना यंदा मोठी कसरत करावी लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे गावागावात तरुणांचा बोलबाला असून ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या पुढाऱ्यांना घरी बसवण्यासाठी तरुणांची एकी झाली आहे.

निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर युवा उमेदवारांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे यंदा ग्रामपंचायत नावावर केलेल्या पुढाऱ्यांचा पत्ता कायमचा कट होणार का ? याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या