भुसावळ : तिसऱ्या दिवशी २८८ जणांचे अर्ज दाखल

jalgaon-digital
2 Min Read

भुसावळ – प्रतिनिधी – Bhusawal :

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी २८८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आतापर्यंतचा आकडा ३३१ वर पोहेचला आहे. आणखी अर्ज दाखल होतील. मात्र निवडणुकीचे चित्र ४ रोजी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.

तालुक्यतील २६ ग्रा.पं.चा निवडणुक कार्यक्रम सुरु झाला असून अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी दि. २९ रोजी २८८ जणांनी अर्ज दाखल केले असून त्यात कुर्‍हे प्र,न. १५, काहुरखेडा १२, खंडाळे ४, किन्ही १६, कंडारी ३२, फेकरी १४, पिंपळगाव बु.२, जोगलखेडा-भानखेडा १३, साकेगाव ३४, साकरी १८, टहाकळी ६, जाडगाव ४, बोहर्डी बु ४ सुसरी ६, बेलव्हाळ ७, पिंपरीसेकम २५, हतनुर ६, वांजोळे-मिरगव्हाण २, शिंदी ११, खडके ३६, मांडवे दिगर ४, दर्यापूर १७ या गावांचा समावेश आहे.

दरम्यान ३० रोजी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत असल्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर ३१ रोजी छाणणी, ४ जानेवारी रोजी माघार व चिन्ह वाटप, आणि त्यानंतर १५ रोजी प्रत्यक्ष मदतन होणार आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसीलदार दीपक धिवरे व नायब तहसीलदार संजय तायडे काम पहात आहे.

बिनविरोधसाठी प्रयत्न- तालुक्यातील बिनविरोध निवड होणार्‍या ग्रा.पं.च्या विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तालुक्यातील किती ग्रामपंचातींची बिनविरोध निवड होते. व हा निधी किती ग्रा.पं. मिळवता याकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी ग्रा.पं.च्या निती आखली जात आहे. तर काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी स्थाननिक पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आपल्या पदरात काय पाडून घेता येईल याकडेही राजकारण्यांचे लक्ष लागून आहे. ४ रोजी मघारीनंतर निवडणुकीच खरे चित्र समोर येईल.

असे आहेत इच्छुक

तालुक्यातील कठोरा बु, कठोरा, आचेगाव ग्रा.पं. साठी अद्याप एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. तर कमी अर्ज आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मन्यारखेडा १, पिंपळगाव बु. २, वांजोळा -मिरगव्हाण ३ जाडगाव, बोहर्डी, मांडवेदिगर प्रत्येकी ४-४. तर सर्वाधिक अर्ज कंडारी ४२, खडके ४० तर साकेगाव ३९ अर्ज या ग्रामपंचातींचा समावेश आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *