Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा 'करोना योद्धा' सन्मानपत्राद्वारे गौरव

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ‘करोना योद्धा’ सन्मानपत्राद्वारे गौरव

वाजगाव । शुभानंद देवरे Vajgaon

करोना काळात गांव पातळीवर नियमित उपस्थित राहून नागरिकांनी घ्यावयाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देत नागरिकांच्या आरोग्यासाठी अथांग परिश्रम घेत गावातून ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचाऱ्यांनी करोना हद्दपार केला म्ह्णून त्यांना’कोविड योद्धा’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

- Advertisement -

भारतीय मानवाधिकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली वाजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश मोहन, उपरपंच दिपक (बापू) देवरे, पोलीस पाटील निशा देवरे, ग्रामविकास अधिकारी जे. व्ही. देवरे आरोग्य सेवक प्रशांत सोनवणे, आरोग्य सेविका मीनाक्षी पगार, उज्वला सावंत, आशा कर्म.ज्योती आहेर, प्रमिला मगर, ज्योती केदारे व वडाळे येथील कर्तव्यदक्ष अंगणवाडी सेविका चित्रा ठाकरे यांनी आज (दि.११) रोजी परिश्रम घेत गावातून करोना हद्दपार केला म्ह्णून कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीने व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना काळात सर्वाधीक मार्गदर्शन सूचन, उपाययोजना दिल्या व आरोग्य अधिकारी तसेच आशासेविका यांनी आपल्या जीवांची पर्वा न करता लोकांच्या आरोग्याच्या सूरक्षते साठी कोविड काळात आपली कर्तव्य बजावली यामुळे भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिकभाऊ केदारे, नाशिक जिल्हाध्यक्ष अशोक देवरे, नाशिक जिल्हा महासचिव विलास माळी, देवळा तालुका उपाध्यक्षनिलेश गुंजाळ, तालुका महासचिव जगदिश निकम, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम बोरसे, मनोज जगताप तालुका सचिवसह जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी , डॉ.अमित आहेर, तुकाराम सोमवंशी, ग्रा. प.लिपिक (शानु) एस.ए. देवरे, एकनाथ बच्छाव, समाधान केदारे, अशोक देवरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या