Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपुरात 18 एप्रिल रोजी ग्राम अभियान व नागरी विकास सक्षमीकरण अभियान मेळावा

श्रीरामपुरात 18 एप्रिल रोजी ग्राम अभियान व नागरी विकास सक्षमीकरण अभियान मेळावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश प. पू. गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने सोमवार दि. 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6:00 वा. श्रीरामपूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,बोरावके नगर येथे गुरूपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत बालसंस्कार, युवा संस्कार, गर्भसंस्कार त्याच प्रमाणे 18 विभाग सक्षमिकरण या विषयावर मेळावा आयोजित केला आहे.

- Advertisement -

तसेच विवाह संस्कार विभागाअंतर्गत याच दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व जाती धर्मासाठी मोफत विवाह नोंदणी व वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात श्री. मोरे श्री स्वामी समर्थ मार्ग व या मार्गातील विविध विभागांव्दारे चालणारे कार्य याविषयी सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत, तरी सर्व भाविक, सेवेकरी, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीरामपूर तालुका श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या