Thursday, April 25, 2024
Homeनगरधान्य वाटपाचा मशिनवर डाटा दिसत नाही

धान्य वाटपाचा मशिनवर डाटा दिसत नाही

राजुरी |वार्ताहर| Rajuri

धान्य वाटपाचा मशिनवर डाटा दिसत नसल्यामुळे रेशन दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करुन लाभार्थ्यांना धान्य मिळावे, अशी मागणी केली जात आहे. यावरुन अनेकवेळा दुकानदार व लाभार्थी यांच्यात वाद होत असतात.

- Advertisement -

अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गेल्या अनेक दिवसापासून मोफत धान्य व रोखीने धान्य वाटप दर महिन्याला व्यवस्थितरित्या सुरु आहे. परंतु ऑक्टोबरचे गहू व तांदूळ मशिनमध्ये दिसत नसल्यामुळे दुकानदारांना धान्य वाटप करता येत नाही.

ऑक्टोबर महिन्याचे धान्य दुकानात शिल्लक असतानाही ते सर्वसामान्य ग्राहकांना देता येत नसल्यामुळे राहाता तालुक्यात व जिल्ह्यातील काही तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना अशा समस्यांमुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सप्टेंबर महिन्यातही अशीच अडचण आल्याने ते धान्य लाभार्थींना वाटप करता आले नाही.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत कुठल्याही लाभार्थी वंचित ठेवता येत नाही असा नियम असताना केवळ मशिनवर धान्य दिसत नसेल्याने धान्य वाटपात अडचण येत असल्यास प्रशासकीय अधिकारी यांनी इतर पर्याय काय आहे याचाही खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या