Friday, April 26, 2024
Homeनगरपदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा विभागीय उपायुक्तांनी घेतला आढावा

पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा विभागीय उपायुक्तांनी घेतला आढावा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांनी गुरुवारी राहाता तहसील कार्यालयाला भेट दिली. पदवीधर मतदार संघाच्या पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

- Advertisement -

यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, मंडलाधिकारी डॉ. मोहसीन शेख व तालुक्यातील इतर सहा पदनिर्देशीत अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. काळे यांनी पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाबरोबर डाटा एन्ट्री कामकाजाचा आढावाही घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2022 च्या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी पदवीधरांना मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी 7 नोव्हेंबर ही शेवटची मुदत आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत लिंकद्वारेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर मतदार नाव नोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नमुना-18 भरून मंडळ स्तरावर अथवा तहसील कार्यालयात (निवडणूक शाखा) येथे जमा करू शकतात अथवा मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या अधिकृत लिंकद्वारे https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate अर्ज दाखल करू शकतात.

खासगी संस्था, व्यक्ती अथवा राजकीय पक्ष वा कार्यकर्ते यांचेकडून गुगल अथवा इतर लिंकस्द्वारे मतदारांनी आपला नमुना-18 भरल्यास असा अर्ज हा अधिकृत नाही. त्यामुळे उपरोक्त शासकीय लिंक वगळता इतर लिंक्स्द्वारे भरलेला ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अशा नमुना-18 ची तहसील स्तरावर डाटा एन्ट्री केली जात नाही. पदवीधर मतदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत लिंकद्वारेच नमूना-18 भरावा.

– रमेश काळे, उपायुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या