Thursday, April 25, 2024
Homeनगरपदवीधर शिक्षकांमधून अभावित केंद्रप्रमुख पदोन्नती द्या

पदवीधर शिक्षकांमधून अभावित केंद्रप्रमुख पदोन्नती द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे एकापेक्षा अधिक केंद्रांचा पदभार कार्यरत केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यासंदर्भात पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांना निवेदन दिले. यावेळी महासंघाचे मेहताब लदाफ हे उपस्थित होते.

30 जून 2020 पर्यंत बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी, विज्ञान विषयाच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणी देण्यात याव्या, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला देण्यात यावे, डीसीपीएस अंतर्गत कपात करण्यात आलेल्या रक्कमेचा हिशोब शिक्षकांना मिळावा,

सलगसेवा सारखी असणार्‍या पदवीधर शिक्षकांचे उपाध्यापकापेक्षा वेतन कमी आहे ही तफावत दूर करण्यात यावी, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना शासन आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात यावे आदी शिक्षकांच्या मागण्या डोईफोडे यांनी उपशिक्षणाधिकारी पठाण यांच्याकडे मांडल्या.

चर्चेदरम्यान संबंधित कर्मचार्‍यांना याप्रश्नी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना उपशिक्षणाधिकारी पठाण यांनी दिल्या. अभावितपणे केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शासनाकडे परवानगी मागितली असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी पठाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या