Monday, April 29, 2024
Homeनगरपदवीधर शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा तिढा

पदवीधर शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा तिढा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभागाचे आदेश आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यात सापडलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नती रखडल्या आहेत. जिल्ह्यात सध्या केंद्रप्रमुखांच्या 60 जागा रिक्त असल्याने त्याचा ताण ग्रामीण भागात पर्यवेक्षण यंत्रणेवर आणि पर्यायाने गुणवत्तेवर होताना दिसत आहे.

- Advertisement -

2010 पूर्वी प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवणार्‍या केंद्र प्रमुखांची शंभर टक्के पदे ही पदवीधर शिक्षकांमधून भरली जात होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश काढत केंद्र सेवकांची 40 टक्के पदे सरळ सेवेने, 30 टक्के पदोन्नती आणि 30 टक्के पदे स्पर्धा परीक्षेने भरण्याचे आदेश काढले. यासाठी 2014 ला ग्रामविकास विभागाने ही पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश निश्चित केला. यात पद्वीधर शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी पद्वीधर म्हणून सलग तीन वर्षे काम आणि बीएड ही पदवी सक्तीची करण्यात आली.

दरम्यान डिसेंबर 2022 मध्ये पुन्हा शालेय शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख पदावर भरती करण्याचे प्रमाणच बदले. यात पुन्हा 50 टक्के स्पर्धा परीक्षेव्दारे आणि 50 टक्के पदोन्नती हे प्रमाण ठरविण्यात आले. मात्र, पदोन्नतीसाठी पद्वीधर शिक्षक हा प्रशिक्षित शिक्षक असावा (किमान पद्वीधर) असे नमुद केले.

मात्र, त्यावर ग्रामविकास विभागाने अद्याप कोणताच आदेश काढलेला नाही. जिल्ह्यात 2014 पासून पदोन्नतीने भरावयाची पदे भरलेली नाहीत, याला कारण ही पदे रिक्त नाही. दुसरीकडे पद्वीधर शिक्षकांमधून शास्त्र विषय असणार्‍या पद्वधीर यांना केंद्रप्रमुख करण्यात यावे, अशी मागणी आहे.

या सर्व गोंधळात प्राथमिक शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख पदोन्नतीचा निर्णय घेतला. मात्र, याच दरम्यान, शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे हे प्रकरण पुन्हा मागे पडले. याच दरम्यान 12 पद्वीधर शिक्षक पदोन्नती मिळावी, यासाठी थेट न्यायालयात गेल्याने हा विषय आणखी क्लिष्ट बनला आहे.

जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची 246 पदे मंजूर आहेत. पूर्वीच्या शासन निर्णयानूसार यातील 96 पदे ही सरळसेवेने, तर 74 पदे पदोन्नतीने आणि 74 पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यात येत होती. मात्र, पुन्हा शालेय शिक्षण विभागाने या पदावरील नियुक्तांचे प्रमाण 50-50 टक्के केल्याने प्राथमिक शिक्षण विभागासमोरील पेच वाढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या