Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापदवीधर निवडणूक विश्लेषण: नाशिकमध्ये तांबे बाजी मारणार की आघाडीला मिळणार यश

पदवीधर निवडणूक विश्लेषण: नाशिकमध्ये तांबे बाजी मारणार की आघाडीला मिळणार यश

नाशिक | फारुक पठाण | Nashik

मागील सुमारे पंधरा वर्षापासून नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात (Nashik Division Graduate Constituency) संगमनेरचे डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir tambe) हे आमदार म्हणून सोप्या पद्धतीने निवडून येत आहे.

- Advertisement -

मात्र यंदा अख्ख्या राज्यात नाशिक मतदार संघाची निवडणूक (election) विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे. त्याचे कारणे तसेच आहे आ. डॉ. तांबे यांना काँग्रेसने (congress) उमेदवारी देऊनही त्यांनी ऐन वेळेला उमेदवारी अर्ज (Application for candidacy) दाखल न करता मोठ्या मुलाचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

यामुळे त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने (congress Party) कारवाई केली तर दुसरीकडे धुळ्याच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, मात्र नंतर राजकीय घडामोडी होऊन त्यांना महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिला आहे. आज मतदान (voting) संपले, आता सर्वांच्या नजरा दोन तारखेच्या निकालाकडे लागले आहे. सत्यजित तांबे बाजी मारणार की शुभांगी पाटील यांच्या रूपाने महाविकास आघाडी यश मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

तसे पाहिले गेले तर केंद्रासह राज्यात डबल इंजिनचे सरकार असलेल्या भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) अधिकृत उमेदवार शेवटपर्यंत मिळालाच नाही, मात्र अघोषितपणे सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनाच भाजपचा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र तांबे हे स्वतः अपक्ष असल्याचा दावा करत आहे. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) देखील शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर करावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडी व भाजप दोघांनाही अधिकृत उमेदवार मिळालाच नाही, असे बोलले जात आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाची (Nashik Division Graduate Constituency) निवडणूक जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोण राहणार अशी चर्चा सुरू झाली होती. सुरुवातीला अहमदनगर येथील ना. विखे पाटील यांचे भाऊ भाजपकडून उमेदवार राहणार असल्याच्या चर्चा आल्या होत्या मात्र त्या फक्त चर्चेत राहिल्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक मानली जात आहे. कारण मुंबईच्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराने एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधकांसाठी राज्यातील विधानपरिषद निवडणुक महत्त्वाच्या मानल्या जात आहे.

पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत नसली तरी अधिकृत उमेदवार जाहीर करावा लागतो. इतर ठिकाणीही काही प्रमाणात गोंधळ झाले, मात्र नाशिक विभागात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. राजकीय घडामोडी मागील चार आठवड्यांपासून सुरू आहेत, तर त्याचा परिणाम दोन तारखेला दिसून येणार आहे. तांबे परिवार तसा काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. तरीही आ.डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मोठ्या मुलाला म्हणजेच सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून अर्ज का दाखल केला या प्रश्नाचा उत्तर मिळालेला नाही.

नाशिक विभागाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे देखील चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. शिवसेनेने थेट अपक्ष शुभांगी पाटील यांना मातोश्रीवर बोलावून चर्चा केल्यामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला. हळूहळू राजकीय वातावरण बदलत गेले व पाटील या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार झाल्या. यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक मध्ये मेळावा घेतला तर शिवसेनेच्या वतीने आ.विलास पोतनीस यांच्यासह इतर नेत्यांना नाशिक मध्ये पाठवून या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील प्रयत्न केल्याचे दिसून आले.

दरम्यान तांबे यांना विविध संघटनांनी प्रचारादरम्यान जाहीर पाठिंबा दिला. दोन्ही बाजूने प्रचाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवली व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसे पहिले गेले तर नाशिक विभागात एकूण 16 उमेदवार रिंगणात आहे. मात्र चर्चा या दोन्ही उमेदवारांची होत असली तरी दोन तारखेला काय निकाल येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या