Friday, April 26, 2024
Homeनाशिककोरोना : गोविंद नगर, मनोहर नगर केंद्रस्थान ठेवून ३ किमी परिसर पुढील...

कोरोना : गोविंद नगर, मनोहर नगर केंद्रस्थान ठेवून ३ किमी परिसर पुढील १४ दिवस सील

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर गोविंद नगर, मनोहर नगर केंद्र स्थान ठेवत 3 किलोमीटर त्रिज्या पर्यंतचा परिसर 14 दिवस सील करण्यात  आला आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढला आहे. या  प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडुन बाहेर येऊ शकणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही.

- Advertisement -

या परिसरातील नागरिकांचे सर्व्हेक्षण होईल त्यानंतर प्रत्येक नागरिकाची नोंद तसेच तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती गमे यांनी दिली आहे.

कोविड १९ बाधित क्षेत्रातुन आलेल्या नागरिकांची तपासणी करुन कोविड-१९ बाधित आहे किंवा नाही हे निश्चित केले जाते. त्याअनुषंगाने मनोहर नगर, गोविंद नगर, नाशिक या परिसरात वास्तव्यात असलेला व्यक्ती कोविड-१९ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. या  रुग्णावर कोविड-१९ करीता निश्चित रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून रणनीती आखण्यात आली आहे, त्यानुसार, कोविड-१९ बाधित व्यक्तीचे निवासस्थान सुमंगल को.ऑप. सोसायटी, मनोहर नगर, गोविंद नगर, नाशिक केंद्रस्थानी ठेऊन तीन किलोमिटर त्रिज्येचा परिसर हे १४ दिवसांकरीता प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आला आहे.

यामध्ये या  प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडुन बाहेर येऊ शकणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही.

या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न केल्यास अथवा उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त गमे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या