गोविंदा आला रे…

jalgaon-digital
4 Min Read

किरण विठ्ठल पाटील Kiran Vitthal Patil

ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुमच्या तालावरी नाचत आला गोविंदा हरी… गोविंदा आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला. असे तारुण्यमय चित्र घरोघरी दारोदारी गल्ली बोळात पाहायला मिळायचे. दहीहंडी Dahī haṇḍī हा मुलांचा, तरुण युवक, युवतींचा उस्तव संपूर्ण जोश, आनंद, चैतन्य, दिव्यतेज चेहर्‍यावर, मनावर, विचारांवर प्रभाव टाकणारा उत्सव… पण सध्या संपूर्ण विश्वात महामारीचा आजार कोरोना हा गेल्या दीड वर्षापासून आपल्या देशात आहे.

कोरोनाची दूसरी लाट हळूहळू ओसरते आहे. पण अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे यंदा हि मागच्यावर्षा प्रमाणे निर्बंध आहेत. माझ्या सर्व युवक मित्र, मैत्रिणींना विनंती आहे की आपण सर्वांनी दहीहंडी हा उस्तव अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा. गर्दी होईल असे कोणतेहि कार्य, काम करू नका. कारण गर्दी होणे म्हणजेच कोरोना संक्रमण वाढायला सुरुवात होत असते.

आपण सर्व सुजाण, समजदार व देशाचे सर्वोत्कृष्ट युवा नागरिक आहात त्यामूळे आपणहि अगदी साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करा व आपल्या आजूबाजूला हि सर्वाँना अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रेरणा द्यावी… दहीहंडी हा उस्तव श्रीकृष्ण भगवान जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे.

जन्माष्टमी सण श्रीकृष्ण भगवान यांच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. या उत्सवाच्या वेळी पूजा, प्रवचन, कीर्तन, भजन, मंत्रघोष अशा विविध कार्यक्रमांनी दिवस, रात्र कशी संपते हे कळतही नाही… त्यानंतर दुसर्‍या दिवशी नवमीला गोविंदा आला रे आला असं म्हणत दहीहंडी उत्सव सुरू होतो. दहीहंडी हा तरुण युवक युवतींचा आवडता सण. केवळ युवक मित्रच गोविंदा पथक तयार करतात असं नाही आहे तर युवतींचा ही गोपिका पथक तयार करतात काही ठिकाणी तर फक्त मुलींचेच म्हणजेच गोपिकांचेच पथक दहीहंडी फोडतात.

सध्या कोरोनामुळे दहीहंडीचा उत्सव यावर निर्बंध आहेत. आधी दहीहंडी म्हटली की तरुण युवक मंडळी गोविंदा पथक संघ तयार करून गावातील सर्वात मोठी पाच, सहा थर असलेली दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा लागायची भरपूर युवकांचे म्हणजेच गोविंदा पथक तरुण मंडळी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. हा एक प्रकारचा खेळच आहे ज्यात विजेता गोविंदा पथकाला बक्षीस दिले जाते दहीहंडी हा उत्सव दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांत येत असतात. बाळगोपाळ श्रीकृष्ण भगवान जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते.

श्रीकृष्ण भगवानला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती बाळगोपाळ कृष्णा पासून दूध, दही यांचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा माता दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण बाळगोपाळ कृष्ण भगवान तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे यासाठी कृष्ण भगवान यांचे मित्र त्यांना उंच हांडीतून दही मिळविण्यासाठी थर रचत असत. या श्रीकृष्ण भगवान यांच्या पवित्र घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो दहीहंडी मध्ये जे उंच मातीचे मडके बांधलेले असते त्या मडक्यात दही,लोणी, मिठाई, फळे इ. असते दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसर्‍याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात.

या मनोर्‍याचा सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा असतो. हा गोविंदा दह्याने भरलेली हंडी फोडतो व सर्व जल्लोष करतात असेच चित्र संपूर्ण भागात दिसते. गोविंदा आला रे आला म्हणत दहीहंड्या फोडल्या जातात. हांडीच्या खापर्‍या गाईच्या गोठ्यात पुरून ठेवल्या की गाय जास्त दूध देते अशी शेतकरी दादा यांच्या मनात भावना आहे. श्रीकृष्ण भगवान दह्या दुधात वाढला गोरगरीब लोकांच्या व संवगड्याच्या बरोबर खेळला. सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले म्हणून नवमीला दही पोह्यांचा प्रसाद वाटला जातो. गोविंदा रे गोपाळाच्या तालावर तरुण मुले मुली नाचत गात मिरवणूक काढतात…

दह्यात साखर, साखरेत भात, माणुसकीची दहीहंडी उभी करुया देऊन एकमेकांना साथ…उंच उभारू दहीहंडीचा थर, देऊ एकमेकांच्या हातात हात वाढवू माणुसकीचा भार…एकोप्याने जोपासू दहीहंडीचा रंग नाव घेता श्रीकृष्ण भगवान यांचे होऊनी दंग… बोलूया एकमुखाने बोल बजरंग बली की जय. असा हा आपला सर्वांचा आवडीचा दहीहंडीचा उत्सव सर्वांनी प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळाने अगदी साध्या पद्धतीने साजरा करुया. माझ्या सर्व युवक मित्रांनो दहीहंडी साजरा करतांना घेऊया श्रीकृष्ण भगवान यांचे नाम गोविंदा रे गोपाळा कोरोनाचे नियम पाळूया गर्दी टाळुया.सर्वांना दहीहंडी या पवित्र उत्सवा निमित्त मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा…

(लेखक हे जळगाव येथील भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आहेत.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *