Saturday, April 27, 2024
Homeनगरमोकाटेविरोधातील गुन्ह्याचा तपास डिवायएसपी पाटील यांच्याकडे वर्ग

मोकाटेविरोधातील गुन्ह्याचा तपास डिवायएसपी पाटील यांच्याकडे वर्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे याच्या विरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोधू सुरू आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराच्या एका उपनगरात राहणार्‍या तरूणीने मोकाटेच्या विरोधात तोफखान्यात अत्याचाराची फिर्याद दिली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्या गुन्ह्यात वाढीव अ‍ॅट्रोसिटीचे कलम लावण्यात आले होते. अ‍ॅट्रोसिटी कलम लावण्यानंतर सदरचा गुन्हा अहदनगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे वर्ग झाला होता. त्यांच्याकडून सदरचा तपास ग्रामीण पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मोकाटेविरोधात अ‍ॅट्रोसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. मोकाटेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्योराप झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मोकाटेला अटक करा; पीडिताचे एसपींना निवेदन

अत्याचार करून सर्रासपणे गावात फिरणारा आरोपी गोविंद मोकाटे याच्याकडून जीवितास धोका असून, त्याला त्वरीत अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांना दिले. आरोपीला अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा सदर महिलेने दिला आहे. मोकाटे इमामपुर (ता. नगर) गावामध्ये खुलेआम फिरत आहे. राजकीय पुढार्‍यांची त्याच्या मागे ताकद असल्याने व पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात असल्याने त्याला अटक होत नसल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या