Wednesday, April 24, 2024
Homeनगरसरकारी कर्मचारी-अधिकार्‍यांना जीन्स वापरण्यास परवानगी, टी-शर्टला मनाई

सरकारी कर्मचारी-अधिकार्‍यांना जीन्स वापरण्यास परवानगी, टी-शर्टला मनाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने आपल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वेशभूषेबाबत मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत: बदल केले आहेत.

- Advertisement -

त्यानुसार शासकीय कर्मचार्‍यांना जिन्स घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. या अगोदर कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास मनाई करण्यात आली होती.

राज्य सरकारने 8 डिसेंबर रोजी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वेशभूषेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, आता आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत: बदल केला आहे.

या बदलानुसार सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना कार्यालयात जीन्स घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यालयात टी शर्ट घालण्यास मात्र बंदी घालण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाने सुधारित परिपत्रक जारी केले आहे.

या पूर्वी पहिले परिपत्रक जारी करताना सरकार अधिकारी आणि कर्मचार्‍यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी आणि अस्वच्छ असली तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदर कामकाजावर होतो. त्याच प्रमाणे त्याने जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष सरकारने काढला होता.

त्या परिपत्रकाद्वारे सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला होता. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली होती. आता यात अंशत: बदल करत कर्मचार्‍यांना जीन्स घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या