Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकशासकीय अधिकाऱ्याने करून दाखवले! येवल्यासह पंचक्रोशीतूनहोतेय कौतुक...

शासकीय अधिकाऱ्याने करून दाखवले! येवल्यासह पंचक्रोशीतूनहोतेय कौतुक…

येवला | प्रतिनिधी

सरकारी काम अन सहा महिने थांब अशी ग्रामिण भागात अनुभवातून आलेली म्हण आहे. मात्र येवल्याच्या दुय्यम निबंधक या कार्यालयातील भागवत गायकवाड या अधिकार्‍याने आपल्या हटके कामकाजाने येवलेकारांचे मन जिंकले आहे. याबद्दल बी व्ही जी इंडिया लिमिटेड १०८ अँबुलन्सचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंक्राळे यांनी त्यांचा सत्कार केला…

- Advertisement -

रामराज्य अथवा शिवशाही बद्ल जनतेच्या मनात आजही प्रचंड आकर्षण आहे. दुय्यम निबंधक ह्या कार्यालयात नव्यानेच आलेले दुय्यम निबंधक भागवत गायकवाड हे अतिशय प्रसन्न व्यक्तीमत्व असून त्यांनी कार्यालयातील दैनंदिन स्वच्छता कशी राहिल, याची सर्वप्रथम काळजी घेतली. दस्त नोंदनीसाठी आलेल्या पक्षकारांची एकच गर्दी करोना सारख्या महामारित होउ नये, यासाठी त्यांनी टोकन पध्दतीचा अवलंब केला. ज्या क्रमांने पक्षकारांनी त्यांचे दस्त जमा केले, त्यानुसार त्यांना क्रमांक दिले गेले.

त्यामुळे गर्दी होण्याचे कारणच समुळ नष्ट झाले. ह्या कार्यालयापुरत्या मर्यादित असणार्‍या मंद स्पिकरवरुन कोणत्या टोकन क्रमांकाचा नंबर आला आहे, हे प्रसारित होउ लागले. ह्या बदलामुळे कार्यालयातील वातावरणच बदलुन गेले आहे. त्यामुळे ते जनसामांन्याच्या प्रशंसेस पात्रठरले आहेत.

तालुक्यातील व शहरातील पक्षकारांची गैरसोय होउ नये, त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी टोकन पध्दतीचा अवलंब केला आहे. टोकन पध्दतीच्या अभावी दस्त नोंदनीच्या प्रतिक्षेत अस्वस्थपणे चकरा मारत राहणे, हेच येथे येणार्‍यांचे प्राक्तन असायचे. गायकवाड यांनी अवलंबलेल्या टोकन पध्दतीमुळे ही कुचंबना थांबली असुन त्यामुळे करोना सारख्या महामारीत अस्वस्थ झालेल्या जनतेला दुय्यम निबंधक कार्यालयाने दिलासा दिला आहे.

त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवीदास निकम, भाजपा युवाचे तालुका प्रमुख संतोष केंद्रे, शिवसेनेचे सुनील शेळके, अंतू काळे, योगेश काळे, प्रदीप तिपायले आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या