Wednesday, May 8, 2024
Homeनगरसरकारी जागेवरील अतिक्रमण सरपंचास भोवले

सरकारी जागेवरील अतिक्रमण सरपंचास भोवले

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील सरपंच चंद्रकला बाबासाहेब चेंडवल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व सरकारी जागेत अतिक्रमण केले म्हणून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी रद्द केले आहे.

- Advertisement -

गुंजाळे येथील संजय शिवाजी नवले, चंद्रकांत चिमाजी नवले, दीपक कारभारी नवले, प्रशांत तबाजी नवले यांनी दि. 9 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे चंद्रकला चेंडवाल व त्यांचे पती यांनी गुंजाळे येथील सरकारी गट न.63 मधील मिळकत नंबर 258 जमिनीवर अतिक्रमण करून एकत्रित कुंटुबासाठी घर बांधून राहत आहे. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज 86/2012 दि. 14 मार्च 2012 च्या निकालाप्रमाणे अपात्र होवून देखील पुन्हा खोटी माहिती देवून चेंडवल या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले म्हणून त्यांना अपात्र करणेबाबत अर्ज दाखल केलेला होता.

तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत गुंजाळे यांनी सदर बेकायदेशीर अतिक्रमण लपवणेकामी सरपंच पदाचा गैरवापर करून सर्व प्रथम ग्रामपंचायत गुंजाळे च्या मासिक सभा दि. 24 मे 2022 रोजी ठराव क्रमांक 4/2 करुन ग्रामपंचायत मिळकत 258 यामधील घर त्यांची मुले अशोक बाबासाहेब चेंडवल व प्रसाद बाबासाहेब चेंडवल यांचे नांवावरून रावसाहेब भास्कर तांबे यांचे नावे भोगवटादार म्हणून करण्याचा ठराव केला. तसेच चंद्रकला चेंडवल यांचे पती बाबासाहेब चेंडवल यांच्या दि. 22 मे 2022 च्या अर्जाप्रमाणे नळ कनेक्शन देखील रावसाहेब भास्कर तांबे यांचे नावे ट्रान्सफर करण्याचा अर्ज केला आहे. तसेच चंद्रकला चेंडवल यांची मुले अशोक बाबासाहेब चेडवल व प्रसाद बाबासाहेब चेडवल यांचे भोगवटादार सदरी असलेले नांव कमी करुन ग्रामपंचायतीच्या गाव नमुना 8अ चे अता-याला रावसाहेब भास्कर तांबे यांचे नाव भोगवटादार सदरी लावण्यात आले.

तसेच सरपंच चंद्रकला चेंडवल यांनी आपल्या युक्तवादात म्हटले, त्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. तसेच त्यांचे पती बाबासाहेब एकनाथ चेंडवाल हे असून गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर येथील मिळकत नंबर 258 ही सन 2001-2002 पासून त्यांच्या नावे आहे. सदर मिळकतीस दरम्यानचे काळात बाबासाहेब एकनाथ चेंडवाल यांची पत्नी या नात्याने त्याच्या नावाची नोंद झालेली आहे. सदर गुंजाळे ता. राहुरी यांचेकडील कर आकारणी रजिस्टर (असेसमेंट) नमुना 8 चे रजिस्टरचे अवलोकन करता सदर रजिस्टरचे सन 2001-02 च्या रजिस्टरला चंद्रकला चेंडवल यांच्या पतीची नोंद आहे.

ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम कायदा कलम 14(ज-3) ची सुधारणा दि. 21 डिसेंबर 2006 पासून आमंलात आली आहे. ही सुधारणा अंमलात येण्यापूर्वी दि. 21 डिसेंबर 2006 पूर्वी ज्यांनी शासकीय जमीनीवर अतिक्रमण केले होते ते अतिक्रमण नियमीत करण्यात आले होते, ते सदस्य अपात्र ठरणार नाही. तर दोन्ही पक्षाकडून पुर्वी झालेल्या निवड्याचे संदर्भ सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकून घेऊन अर्जदार यांचा अर्ज मंजूर करून चंद्रकला चेंडवल यांचे ग्रामपंचायत सदस्यपद अपात्र ठरविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या