Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसन २०२१पासून शासकीय दिनदर्शिका होणार इतिहास जमा !

सन २०२१पासून शासकीय दिनदर्शिका होणार इतिहास जमा !

मुंबई : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात मंत्रालय सकट सगळ्या सरकारी कार्यालयांमधील दिनदर्शिका, दैनंदिनी आणि विविध प्रसंगी देण्यात येणाऱ्या शुभेच्छा पत्राची छपाई थांबवण्याचे आदेश दिले गेले आहेत,

कोरोनाचा संकटानंतर राज्याच्या महसुलात आलेली तूट भरून काढण्यासाठी हा बचतीचा निर्णय घेण्यात आला आहे, वित्त विभागाने असा शासन निर्णय जारी केलेला आहे.शासनादेशा नुसार मंत्रालयीन प्रशासनिक विभाग, उपविभाग, क्षेत्रिय कार्यालय और सरकारची संलग्न असणाऱ्या कार्यालयांमध्ये आता अशा प्रकारची कॅलेंडर आणि त्या छपाई पत्रे लावता येणार नाहीत, त्यासाठी मुद्रण म्हणजे छपाई केली जाणार नाही, या डिजिटल युगात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग केला जाऊ शकतो असे सरकारचे म्हणणे आहे, आर्थिक बाबी ने ही ते योग्य ठरणार आहे… शासन आदेशानुसार कोरोना संदर्भात माहिती छापावी लागणार च आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ १५टक्के खर्च या छपाई वर केला जाईल, कोरोना संदर्भात माहिती साठी केवळ १५टक्के खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे…

- Advertisment -

ताज्या बातम्या