Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेत पिक नूकसानीची 'एवढी' मदत आतापर्यंत नाशिक जिल्ह्याला प्राप्त

शेत पिक नूकसानीची ‘एवढी’ मदत आतापर्यंत नाशिक जिल्ह्याला प्राप्त

नाशिक । प्रतिनिधी

दिवाळीपुर्वी नूकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात मदत जमा होईल हे महाविकास आघाडी सरकारचे आश्वासन हवेत विरले असून जिल्ह्याला फक्त पन्नास टक्के रक्कम प्राप्त झाली आहे. २ कोटी ४० लाख रुपयांपैकी फक्त १ कोटी दहा लाख मदत मिळाली असून ती देखील शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम कासवगतिने सुरु आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी कडूच झाली आहे.

- Advertisement -

दिवाळीपुर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जून ते आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या पिक नूकसानीपोटि भरपाई म्हणून दहा हजार कोटीचे पॅकेज जाहिर केले होते. दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत जमा होईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यात एकरी दहा हजार तर फळ बागांसाठी एकरी २५ हजार मदत घोषित केली.

त्यात विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व इतर ठिकाणी झालेल्या नूकसानिचा समावेश होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये कमि अधिक प्रमाणात नूकसान होते. विशेष करुन आॅगस्ट व आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सोयाबिन, भात, मका, कांदा व भाजीपाल्याचे मोठे नूकसान झाले होते.

जिल्हा प्रशासनाने नूकसानीचे पंचनामे करुन दोन कोटी ४० लाख रुपयांची मदतीची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी दिवाळीनंतर जिल्हयाला १ कोटी १० लाख ८८ हजार रुपये प्राप्त झाले आहे. एकूण मागणीच्या पन्नास टक्के ही रक्कम असून अद्याप १ कोटी ३२ लाखांची मदत प्राप्त होणे बाकी आहे.

ही मदत प्रामुख्याने पिक नुकसानिची असुन जिल्हाप्रशासनाने तालुक्यांना ही मदत वर्ग केली अाहे. येत्या आठवडयाभरात ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. मात्र दिवाळी झाली तरी मदत प्राप्त न झाल्याने नूकसानग्रस्त शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

पिक नूकसानिचे पैसे मिळत असले तरी घरांची पडझड, पशूधन नूकसान, विज पडून मृत्यू ही मदत प्राप्त होणे बाकी आहे. एकूणच आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकर्‍यांची दिवाळी कडू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या