Google कडून पुन्हा गोंधळ : आता सारा तेंडुलकरला दाखवले क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई

Search Engine गूगलवर आपण डोळे बंद करुन विश्वास ठेवत असतो. पण चुकीच्या माहितीमुळे सध्या गुगल चर्चेत आहे. शुभमन गिलची पत्नी असे सर्च केले तर नाव येते ते सारा तेंडुलकर Sara Tendulkar. सचिन तेंडुलकरची मुलगी. पण प्रत्यक्षात तसे काहीच नाही.

गुगल हे जगभरात लोकप्रिय असलेलं सर्च इंजिन आहे. विविध प्रकारच्या माहितीच्या खजिन्यापर्यंत आपल्याला गुगलद्वारे पोहचता येते. मात्र याच गुगलचा गेल्या काही दिवसांमध्ये काहीसा गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. यामुळे सध्या गुगलचे नेमके काय झाले आहे? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय रहात नाही. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला लेगस्पिनर रशिद खानची पत्नी असल्याचा जावई शोध गुगलने लावला होता.

गुरुवारपासून (१५ ऑक्टोंबर) शुभमन गिल अचानक चर्चेत आला. कारण आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही शुभमन गिलची पत्नी आहे असा नवा गोंधळ गुगलने घातला आहे. भारताचा युवा क्रिकेटपटून शुभमन गिलची पत्नी असे सर्च केल्यास सारा तेंडुलकरचे नाव येते आहे. खरे तर शुभमन गिल व सारा चांगले मित्र आहे. शुभमनचा फलंदाजीचे कौतुक साराने अनेकवेळा केले आहे. साराचे लग्नही झालेलं नाही.

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १२ ऑक्टोबरलाच सारा तेंडुलकरने तिचा २३ वा वाढदिवस साजरा केला. सारा तेंडुलकर ही अपनालय या संस्थेसाठीही काम करते आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *