Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकPhotoGallery : नाशिकच्या रस्त्यांवर शुकशुकाट; फोटो पहा

PhotoGallery : नाशिकच्या रस्त्यांवर शुकशुकाट; फोटो पहा

नाशिक | Nashik

नाशकात करोनाचा पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.परंतु काही ठिकाणी औषधे घेणाऱ्यांची पाहायला मिळाली.

- Advertisement -

राज्यासह शहरात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन असून कालपर्यंत गजबजलेल्या नाशिकच्या रस्त्यांवर आज शुकशुकाट पाहायला मिळतोय.

मुख्य बाजारपेठ ओस

दरम्यान नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड, सराफबाजार, शालिमार, बोहोरपट्टी, सीबीएस आदी परिसरात दुकांनासह हॉटेल्स बंद होती. मेडिकल सह किराणा दुकाने काही अंशी सुरू असल्याचे दिसून आले.

मेहेर सिग्नलवर गोंधळ

विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद असला तरी औषधे घेणाऱ्यांची गर्दी दिसून आली. एमजी रोडवरील मेहेर सिग्नलवर नागरिकांनी गोंधळ घातला. रेमडीसीवरचा तुटवडा असल्याने नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना समजावून सांगत गर्दी कमी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या