Friday, April 26, 2024
Homeधुळेशिरपूरात पिस्टल घेवून फिरणार्‍या ‘सिंह’ची दहशत

शिरपूरात पिस्टल घेवून फिरणार्‍या ‘सिंह’ची दहशत

धुळे – प्रतिनिधी dhule

शिरपूरमध्ये (shirpur) पिस्टल (pistol) घेवून दहशत माजविणार्‍या ‘सिंह’ला स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) जेरबंद केले.

- Advertisement -

वालखेडा फाट्यावर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून 25 हजारांचा गावठी कट्टा व 2 हजारांची एक जिवंत काडतूस असा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला. काल रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार…

२७ गुन्हे दाखल.

दरम्यान पोलिस प्रशासनाने चालु वर्षात जानेवारी ते आजपावेतो पिस्टल व काडतुसबाबत एकुण 27 गुन्हे दाखल आहेत. त्यात 39 पिस्टल (गावठी कटटे) व 62 जप्त काडतुस (राऊंड) जप्त करण्यात आले आहे.

प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार…

हरीओम संजय सिंह (रा.करवंद नाका, शरदचंद्र नगर, शिरपुर) असे संशयीताचे नाव आहे. तो दहशत माजविण्याच्या उद्येशाने सोबत देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत फिरत असतो. तो सोनगीर गावाजवळील वालखेडा फाटयावर उभा आहे, अशी गोपनिय माहिती काल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाल कारवाईचे आदेश केले. त्यानुसार पथकाने वालखेडा फाटयावरुन संशयीत हरीओम संजय सिंह ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पाठीमागील बाजुस गावठी कट्टा (पिस्टल) अडकविलेला मिळुन आला. त्याला परवान्याबाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगितले. त्यामुळे 25 हजारांचा गावठी कट्टा व 2 हजारांचे एक जिवंत काडतुस असा एकूण 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार…

याप्रकरणी हरीओम संजय सिंह याच्याविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3/25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ श्रीकांत पाटील, प्रभाकर बैंसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, मथुर पाटील, कमलेश सुर्यवंशी, तुषार पारधी, राहुल गिरी, कैलास महाजन यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या