Friday, April 26, 2024
Homeराजकीयकाँग्रेसची शेतकरी स्वाक्षरी मोहीम चुकीची - गोंदकर

काँग्रेसची शेतकरी स्वाक्षरी मोहीम चुकीची – गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने पारित केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे आहे असे शेतकरी संघटना व विविध तज्ञांनी मान्य केले आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात हे कृषी विधेयक आणणार असल्याचे जाहीर केले होते पंरतु भाजपाच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने हे कायदे आणल्यावर या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने काही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांची दिशाभूल करून आणि खोटी माहिती देऊन स्वाक्षरी मोहीम राबवून शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी म्हटले आहे.

शिर्डी शहर भाजपच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पारीत करण्यात आलेल्या कृषी विधेयकाची जनजागृती होणे गरजेचे आहे. कामगार व शेतकर्‍यांच्या कायद्याबाबत जनसामान्यांमध्ये खोटा असंतोष पसरविण्याचे काम आघाडी सरकारमधील इतर घटक करत नाही फक्त काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते करत आहे. यावरून काँग्रेस पक्षाची भुमिका शेतकरी विरोधी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या